"श्री.नी. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: श्री.नी. चाफेकर हे पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजात आणि डेक्... |
(काही फरक नाही)
|
००:२६, १८ मे २०१५ ची आवृत्ती
श्री.नी. चाफेकर हे पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजात आणि डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते. ते संस्कृतचे प्रगाढ पंडित होते. याशिवाय त्यांना नाटकाची खास आवड होती. उत्तम नाटक कशा प्रकारे असावे याचा त्यांनी अभ्यास केला होता, आणि रंगभूमीवर काम करणार्या नाटक मंडळ्यांना आणि नटांना ते आपले मत वेळोवेळी सांगून मार्गदर्शन करीत असत. अभिनयाच्या क्षेत्रातही ते चांगले जाणकार होते. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले होते.
सन्मान
पुणे येथे १९२३ साली भरलेल्या १९व्या, आणि १९२७ साली झालेल्या २२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद श्री.नी. चाफेकर यांनी भूषविले होते.
(अपूर्ण)