Jump to content

"लालजी देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लालजी देसाई {जन्म : इ.स. १९२६; मृत्यू : १३ जानेवारी, इ.स. २००९) हे सुरेल...
(काही फरक नाही)

१९:१०, १ मे २०१५ ची आवृत्ती

लालजी देसाई {जन्म : इ.स. १९२६; मृत्यू : १३ जानेवारी, इ.स. २००९) हे सुरेल आणि खणखणीत आवाजाने रसिक मनांना रिझवणारे प्रतिभावान मराठी गायक होते.

लालजींचे खरे नाव वासुदेव होते. 'बालगंधर्वांची गायकी गाणारे लालजी' अशी त्यांची ओळख होती. शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले नसतानाही लालजींनी बालगंधर्वांची पदे ऐकून आत्मसात केली होती. बालगंधर्वांना दैवत मानणारे लालजी यांनी मराठी संगीत रंगभूमीवरही गंधर्व गायक म्हणून नावलौकिक मिळवला होता.

देवाने गोड गळा दिला. त्या गळ्यानिशी लालजींनी 'बालगंधर्व' या दैवताचे मनोमन पूजन केले. एकलव्याप्रमाणे त्यांच्या गाण्याची साधना केली आणि ते गाणे रसिकांसमोर तन्मयतेने सादर केले, स्वत: आनंद घेतला. इतरांनाही दिला. लालजी देसाई यांनी गायलेले 'जोहार मायबाप' हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राला तेच नाव दिले आहॆ.

लालजींची नाट्यकारकीर्द

'वाऱ्यावरची वरात' नाटकाच्या आधी दुसऱ्या नाटकात काम करण्यासाठी पु.ल. देशपांडे यांनी लालजींना बोलावले होते. 'आपण गाणं चांगलं गाऊ पण अभिनय म्हणजे महाकठीण', असे लालजींना वाटत होते. तरी पुलंच्या आग्रहाखातर हे तिथे गेले आणि तिथे गेल्यावर विजया मेहता, अरविंद देशपांडे यांच्यासारखे दिग्गज पाहिल्यावर लालजींची इतकी भंबेरी उडली की ते तालीम सोडून घरी पळून आले.

लालजी देसाई यांची भूमिका असलेली नाटके

  • वाऱ्यावरची वरात

लालजी यांनी गायलेली नाट्यगीते

  • कांते फार तुला
  • जोहार मायबाप जोहार
  • दे मज देवा जन्म हा
  • धावत येई सख्या यदुराया


(अपूर्ण)