Jump to content

"संगीता भाटिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६: ओळ १६:


==सन्मान==
==सन्मान==
* सॅन डिॲगोच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात असोशिएट प्राध्यापक असताना संगीता भाटिया यांना पॅकार्ड फेलोशिप मिळाली होती.
* टेक्नॉलॉजी रिव्ह्यू नावाच्या नियतकालिकाने २००३ साली भाटिया यांची पस्तीसहून लहान वयाच्या तरुण शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला होता.
* इ.स. २००६मध्ये डॉ.  भाटिया यांची 'द सायन्टिस्ट' या नियतकालिकाने 'ज्यांच्या कामाकडे जगाचे लक्ष असावे अशा व्यक्तींत' निवड केली होती.
* इ.स. २००६मध्ये डॉ.  भाटिया यांची 'द सायन्टिस्ट' या नियतकालिकाने 'ज्यांच्या कामाकडे जगाचे लक्ष असावे अशा व्यक्तींत' निवड केली होती.
* ब्राऊन विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यालयाने २०११ साली त्यांना बीम (BEAM - Brown Engineering Alumni Medal) ह्या पुरस्काराने सन्मानित केले होते.
* दिवंगत अमेरिकी सिनेटर एच. जॉन हेन्झ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला अडीच लाख डॉलरचा पुरस्कार डॉ. भाटिया यांना जाहीर झाला आहे.
* दिवंगत अमेरिकी सिनेटर एच. जॉन हेन्झ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला अडीच लाख डॉलरचा पुरस्कार डॉ. भाटिया यांना जाहीर झाला आहे.



१३:१६, २८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

डॉ. संगीता भाटिया या एक जैव अभियंता आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड-एमआयटीच्या त्या एम.डी. पीएच.डी. असून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक आहेत. दही खायचे अणि आतड्याचा कर्करोग ओळखायचा, संगणकात असतात तशा छोट्याशा चिपसारखे सूक्ष्म यकृत तयार करायचे यांसारख्या काल्पनिकेत शोभणाऱ्या गोष्टी संगीता भाटिया यांनी शक्य करून दाखवल्या आहेत.

भाटिया यांचे आईवडील भारतातून बोस्टनला गेले. त्यांचे वडील अभियंता, तर आई भारतात पहिल्यांदा ज्या मोजक्या महिला एमबीए झाल्या त्यांत एक होत्या.  लहान असताना वडिलांनी संगीता यांना एमआयटी या संस्थेत नेले होते. तिथे कर्करोगाच्या उपचारासाठीचे एक यंत्र त्यांना बघायला मिळाले. त्यामुळे त्यांचा जैव अभियंता बनायचे हा संगीता भाटिया यांचा निश्चय पक्का झाला. सुरुवातीला त्यांनी ब्राऊन विद्यापीठात जैवअभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांना हार्वर्ड-एमआयटीच्या आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने एम.डी. पीएच.डी.साठी प्रवेश नाकारला होता, पण नंतर तो मिळाला.

डॉ.संगीता भाटिया यांचे संशोधन

१. त्यांनी एक सूक्ष्म यकृत तयार केले आहे, ते मानवी यकृतासारखे काम करते. इलेक्ट्रॉनिक्समधील फोटोलिथोग्राफी तंत्र त्यांनी यकृत तयार करताना वापरले.
२. गर्भवती महिलांची चाचणी करून एका पट्टीच्या मदतीने गर्भधारणा आहे की नाही हे ठरवतात तशीच एक पट्टी त्यांनी तयार केली असून त्यावर कर्करोगाचे निदान करता येते.
३. जैवनिदर्शकांच्या माध्यमातून पूरस्थ ग्रंथीचा कर्करोग ओळखण्याची युक्तीही त्यांनी शोधली आहे.
४. उंदरांमध्ये नॅनोकण टोचले, तेव्हा त्यातील रेणूंची अभिक्रिया कर्करोगातील गाठीशी झाली व ज्या उंदरांना कर्करोग होता त्यांचे मूत्राशय प्रकाशित झाले, हा डॉ. भाटिया यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
५. कर्करोग निदानासाठी कमी खर्चाच्या चाचण्या त्यांनी शोधल्या असून अनेक पेटंटही घेतली आहेत.

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी मानवी उतींची दुरुस्ती व पुनर्निर्मिती यासाठी केला आहे. त्यांच्या या संशोधनातून यकृतरोपणात मोठे यश मिळणार आहे.

लेखन

डॉ. संगीता भाटिया यांनी 'मायक्रोफॅब्रिकेशन इन टिश्यू इंजिनीयरिंग ॲन्ड बायोआर्टिफिशियल ऑर्गन्स', 'मायक्रोडिव्हाइसेस इन बायॉलॉजी' व 'मेडिसिन ॲन्ड बायोसेन्सिंग' ही पुस्तके लिहिली आहेत.

सन्मान

  • सॅन डिॲगोच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात असोशिएट प्राध्यापक असताना संगीता भाटिया यांना पॅकार्ड फेलोशिप मिळाली होती.
  • टेक्नॉलॉजी रिव्ह्यू नावाच्या नियतकालिकाने २००३ साली भाटिया यांची पस्तीसहून लहान वयाच्या तरुण शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला होता.
  • इ.स. २००६मध्ये डॉ.  भाटिया यांची 'द सायन्टिस्ट' या नियतकालिकाने 'ज्यांच्या कामाकडे जगाचे लक्ष असावे अशा व्यक्तींत' निवड केली होती.
  • ब्राऊन विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यालयाने २०११ साली त्यांना बीम (BEAM - Brown Engineering Alumni Medal) ह्या पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • दिवंगत अमेरिकी सिनेटर एच. जॉन हेन्झ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला अडीच लाख डॉलरचा पुरस्कार डॉ. भाटिया यांना जाहीर झाला आहे.