संगीता भाटिया
डॉ. संगीता एन. भाटिया (इ.स. १९६८ - ) या एक जैव अभियंता आहेत. यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ व मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून एम.डी. पीएच.डी. पदव्या मिळविलेल्या असून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक आहेत. दही खायचे अणि आतड्याचा कर्करोग ओळखायचा, संगणकात असतात तशा छोट्याशा चिपसारखे सूक्ष्म यकृत तयार करायचे यांवर भाटियांनी काम केलेले आहे[ संदर्भ हवा ].
भाटिया यांचे आईवडील भारतीय असून बॉस्टनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे वडील अभियंता, तर आई भारताती पहिल्या काही महिला एमबीए घेणाऱ्यांपैकी एक होत्या. सुरुवातीला त्यांनी ब्राऊन विद्यापीठात जैवअभियांत्रिकीचा अभ्यास केला.
संशोधन
[संपादन]१. त्यांनी एक सूक्ष्म यकृत तयार केले आहे, ते मानवी यकृतासारखे काम करते. इलेक्ट्रॉनिक्समधील फोटोलिथोग्राफी तंत्र त्यांनी यकृत तयार करताना वापरले.
२. गर्भवती महिलांची चाचणी करून एका पट्टीच्या मदतीने गर्भधारणा आहे की नाही हे ठरवतात तशीच एक पट्टी त्यांनी तयार केली असून त्यावर कर्करोगाचे निदान करता येते.
३. जैवनिदर्शकांच्या माध्यमातून पूरस्थ ग्रंथीचा कर्करोग ओळखण्याची युक्तीही त्यांनी शोधली आहे.
४. उंदरांमध्ये नॅनोकण टोचले, तेव्हा त्यातील रेणूंची अभिक्रिया कर्करोगातील गाठीशी झाली व ज्या उंदरांना कर्करोग होता त्यांचे मूत्राशय प्रकाशित झाले, हा डॉ. भाटिया यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
५. कर्करोग निदानासाठी कमी खर्चाच्या चाचण्या त्यांनी शोधल्या असून अनेक पेटंटही घेतली आहेत.
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी मानवी उतींची दुरुस्ती व पुनर्निर्मिती यासाठी केला आहे. त्यांच्या या संशोधनातून यकृतरोपणात मोठे यश मिळणार आहे.
लेखन
[संपादन]डॉ. संगीता भाटिया यांनी 'मायक्रोफॅब्रिकेशन इन टिश्यू इंजिनीयरिंग अँड बायोआर्टिफिशियल ऑर्गन्स', 'मायक्रोडिव्हाइसेस इन बायॉलॉजी' व 'मेडिसिन अँड बायोसेन्सिंग' ही पुस्तके लिहिली आहेत.
सन्मान
[संपादन]- सॅन डिॲगोच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात असोशिएट प्राध्यापक असताना संगीता भाटिया यांना पॅकार्ड फेलोशिप मिळाली होती.
- टेक्नॉलॉजी रिव्ह्यू नावाच्या नियतकालिकाने २००३ साली भाटिया यांची पस्तीसहून लहान वयाच्या तरुण शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला होता.
- इ.स. २००६मध्ये डॉ. भाटिया यांची 'द सायन्टिस्ट' या नियतकालिकाने 'ज्यांच्या कामाकडे जगाचे लक्ष असावे अशा व्यक्तींत' निवड केली होती.
- दिवंगत अमेरिकी सेनेटर एच. जॉन हेन्झ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला अडीच लाख डॉलरचा पुरस्कार डॉ. भाटिया यांना जाहीर झाला आहे.
- ब्राऊन विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यालयाने २०११ साली त्यांना बीम (BEAM - Brown Engineering Alumni Medal) ह्या पुरस्काराने सन्मानित केले होते.