"रघुनाथ कृष्ण फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
आर्थिक ओढाताण होत असल्याने फडक्यांचे संपूर्ण आयुष्यच हलाखीच्या परिस्थितीत गेले. मात्र तरीही त्यांनी पोट भरण्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला नाही. शिल्पकलेसोबतच त्यांना संगीताचीदेखील आवड होती. ते स्वत: गायन-वादन शिकवीत असत. अभिजात भारतीय नाट्यसंगीताचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांनादेखील फडके यांनी तबल्याची साथ केली होती. . तत्कालीन ज्येष्ठ कलाकार गोविंदराव टेंबे आणि हिराबाई बडोदेकर यासारख्या कलाकारांनी आपला पुतळा फडके यांनीच तयार करावा असा आग्रह धरला होता, यातच फडकेंची शिल्पकलेतील महानता लक्षात येते. रघुनाथ फडके हे महादेव धुरंधरांच्या कन्या, अंबिका धुरंधर यांना दहा बारा पाने लांबीची पत्रे पाठवत असत. त्यांतून अंबिकाबाईंना विविध कला आणि साहित्यप्रकारांबद्दल नवनव्या गोष्टी कळायच्या, असे अंबिकाबाईंनी त्यांच्या 'माझी स्मरणचित्रे' या पुस्तकात लिहिले आहे.

==लेखन==
==पुस्तकलेखन==
रघुनाथ कृष्ण फडके यांनी 'स्वल्पविराम' नावाचे विनोदी लेखांचे एक पुस्तक लिहिले आहे, ते इ.स. १९३७मध्ये धारच्या 'तरुण साहित्य-माले'ने प्रकाशित केले होते.
* रघुनाथ कृष्ण फडके यांनी 'स्वल्पविराम' नावाचे विनोदी लेखांचे एक पुस्तक लिहिले आहे, ते इ.स. १९३७मध्ये धारच्या 'तरुण साहित्य-माले'ने प्रकाशित केले होते.
* [[व.पु. काळे]] यााच्या 'सांगे वडिलांची कीर्ती' नामक पुस्तकात र.कृ. फडके यांचे एक मराठी पत्र छापले आहे, त्या पत्रावरून फडक्यांची भाषा किती लालित्यपूर्ण होती हे जाणवते.

==सन्मान==
==सन्मान==

२२:५०, २६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

रघुनाथ कृष्ण फडके (इ.स. १८८४ - १७ मे, इ.स. १९७२) हे मराठी शिल्पकार होते. यांना इ.स. १९६१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

रघुनाथ कृष्ण फडके यांनी मूर्तिकला, चित्रकला यांपैकी कशाचेही शिक्षण शाळा किंवा कलाशाळेत जाऊन घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे या दोन कलांविषयी असलेले ज्ञान, माहिती व कौशल्ये हे सारे स्वकष्टातून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे प्रगल्भ झालेले होते. रघुनाथ फडके मात्र मूर्ती घडवण्याच्या कामात निपुण होते. मुंबईच्या चौपाटीवर असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा त्यांनीच घडवला. या पुतळ्याच्या बनावटीवरून फडकॆ यांचे ओतकामातील कौशल्य व इतर काही तांत्रिक बाबी लक्षात येतात.महादेव धुरंधरांसारखे श्रेष्ठ चित्रकारदेखील त्यांना मानत होते.

शिवाजीचा पुतळा

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभे करायचे, हा विचार लोकमान्य टिळकांच्या मनात रुंजी घालत होता. शिल्प कुणी घडवायचे? स्वरूप काय? अशा महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेण्यासाठी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत लोकमान्य टिळकांनी र. कृ. फडके या आपल्या घनिष्ठ मित्र आणि उदयोन्मुख शिल्पकाराला शिवशिल्प घडवण्याचा आदेशच दिला. फडकेंनी होकार दिला आणि संगमरवरातलं शिल्प घडवण्याच्या ते कामाला लागले. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’च्या थाटात फडकेंनी शिवरायांचे दिव्य रूप जणू अनुभवले आणि आपल्या शिल्पकाव्यात गुंफले. छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातले हे पहिले शिल्प फडके यांनी जेव्हा साकारले, तेव्हा त्यांनी फक्त वयाची तिशी ओलांडली होती. लोकमान्यांच्या निर्वाणानंतर १९२३ साली शिवाजी महाराजांचा हा अर्धपुतळा पुण्यातल्या शिवाजी मंदिरात उभारण्यात आला.

कारकीर्द

धारच्या संस्थानिकांच्या बोलावण्यावरून फडके धार येथे गेले व तेथे आपला स्टुडिओ काढून त्यांनी शिल्पे घडवली. तेथे त्यांनी उदाजीरावांचा पुतळा बनवला, व इतरही अनेक लहान-मोठे पुतळे त्यांनी तयार केले.

विशेष

आर्थिक ओढाताण होत असल्याने फडक्यांचे संपूर्ण आयुष्यच हलाखीच्या परिस्थितीत गेले. मात्र तरीही त्यांनी पोट भरण्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला नाही. शिल्पकलेसोबतच त्यांना संगीताचीदेखील आवड होती. ते स्वत: गायन-वादन शिकवीत असत. अभिजात भारतीय नाट्यसंगीताचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांनादेखील फडके यांनी तबल्याची साथ केली होती. . तत्कालीन ज्येष्ठ कलाकार गोविंदराव टेंबे आणि हिराबाई बडोदेकर यासारख्या कलाकारांनी आपला पुतळा फडके यांनीच तयार करावा असा आग्रह धरला होता, यातच फडकेंची शिल्पकलेतील महानता लक्षात येते. रघुनाथ फडके हे महादेव धुरंधरांच्या कन्या, अंबिका धुरंधर यांना दहा बारा पाने लांबीची पत्रे पाठवत असत. त्यांतून अंबिकाबाईंना विविध कला आणि साहित्यप्रकारांबद्दल नवनव्या गोष्टी कळायच्या, असे अंबिकाबाईंनी त्यांच्या 'माझी स्मरणचित्रे' या पुस्तकात लिहिले आहे.

लेखन

  • रघुनाथ कृष्ण फडके यांनी 'स्वल्पविराम' नावाचे विनोदी लेखांचे एक पुस्तक लिहिले आहे, ते इ.स. १९३७मध्ये धारच्या 'तरुण साहित्य-माले'ने प्रकाशित केले होते.
  • व.पु. काळे यााच्या 'सांगे वडिलांची कीर्ती' नामक पुस्तकात र.कृ. फडके यांचे एक मराठी पत्र छापले आहे, त्या पत्रावरून फडक्यांची भाषा किती लालित्यपूर्ण होती हे जाणवते.

सन्मान

शिल्पकार फडके हे १९३७च्या मे महिन्यात धार येथे झालेल्या मध्य भारतीय साहित्य संमेलनाच्या 'कला आणि काव्य परिषदे'चे अध्यक्ष होते.

चरित्र

र.कृ. फडके यांचे 'शिल्पकार फडके' नावाचे चरित्र ह.वि. माटे यांनी संपादित केले आहे.