"वासंती (चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वासंती विनायक घोरपडे -सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (जन्म : कोल्ह...
(काही फरक नाही)

२२:१९, २५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

वासंती विनायक घोरपडे -सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२२; हयात) या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या.

१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खां साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यातही त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथासूनच त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

१ जून १९२९ रोजी विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून [[पुणे|पुण्याला\\ स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांत व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत अस.. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्ट’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.

प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरूभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.



(अपूर्ण)

मराठी अभिनेत्री मराठी गायिका इ.स.१९२२ मधील जन्म