"भानुमती कंस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: भानुमती कंस या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी ग... |
(काही फरक नाही)
|
१८:०१, २३ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
भानुमती कंस या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक मराठी भावगीते अजरामर झाली.
एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांचा विवाह कुमार गंधर्व यांच्याशी झाला आणि ते दोघे मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी कुमार गंधर्व यांना क्षयाची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात कुमारांचे एक फुफ्फुस कायमस्वरूपी निकामी झाले. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रूषा केली. भानुमती त्या आधी बी.आर.देवधरांकडे गाण्याचे शिक्षण घेत होत्या. लग्नानंतर त्या कुमार गंधर्वांकडेच शिकू लागल्या. भानुमातींच्या मदतीने कुमार आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली.
मात्र, १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमती कंस यांचे निधन झाले व त्यानंतर कुमार गंधर्वांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला.
भानुमती कंस यांनी गायलेली प्रसिद्ध भावगीते
- अंतरिंच्या अपुऱ्या आशा (कवी - मा. ग. पातकर, संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
- नदीकिनारी माझा गाव (कवी - राजा बढे, संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे)
- नयनी तिच्या आसू येतील का