"मानसी सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
मानसीने दहावीपासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वाचनाच्या माध्यमातून पैलू पाडायला सुरुवात केली. [[सांगली]]च्या सिटी हायस्कूलमधून दहावीला ९० टक्के गुण मिळविलेल्या मानसी अकरावीसाठी पुण्यात आल्या; त्यांनी [[फर्ग्युसन कॉलेज]]मध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. इंग्रजीत |
मानसीने दहावीपासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वाचनाच्या माध्यमातून पैलू पाडायला सुरुवात केली. [[सांगली]]च्या सिटी हायस्कूलमधून दहावीला ९० टक्के गुण मिळविलेल्या मानसी अकरावीसाठी पुण्यात आल्या; त्यांनी [[फर्ग्युसन कॉलेज]]मध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. इंग्रजीत |
||
बी.ए. करताना मानसी सप्रे यांचा पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक आला. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी, इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असतानाही, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयूत) प्रवेश मिळवला व उच्च शिक्षणाची स्कॉलरशिपही प्राप्त केली. |
बी.ए. करताना मानसी सप्रे यांचा पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक आला. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी, इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असतानाही, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयूत) प्रवेश मिळवला व उच्च शिक्षणाची स्कॉलरशिपही प्राप्त केली. |
||
साहित्याचे चौफेर वाचन आणि माध्यमांचे आकर्षण यातून मानसी सप्रे यांनी जेएनयूमध्ये असताना ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झॅमिनेशन दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. नंतर त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये मीडिया मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम दॊन वर्षात पूर्ण केला.. याच काळात त्यांना रिसर्च असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे खर्चाची फिकीरही करावी लागली नाही. |
|||
==व्यवसाय== |
==व्यवसाय== |
||
भारतात आल्यावर मानसी सप्रे यांनी हैदराबादेत ईटीव्हीमध्ये प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून काम केले. त्यावेळी टेलिफिल्म आणि सीरिअल्ससाठी लेखन ते निर्मिती या टप्प्यावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडता आल्या. अशाच कामासाठी त्या मुंबईत यूटीव्हीमधील कोअर लीडरशिपमध्ये काम करू लागल्या. तिथे मानसी सप्रे यांनी आशय आणि सादरीकरणाच्या पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सिनेमा आणि चॅनल्सवरील कोणतीही मालिका असली तरी त्यात काही ना काही कंटेंट, मेसेज आणि कुणासाठी तरी मोटिव्हेशन असतेच, असे त्यांचे मत आहे. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==पुणे मर्डर क्रॉनिकल== |
==पुणे मर्डर क्रॉनिकल== |
१३:१३, १९ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
मानसी सप्रे या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांच्या 'पुणे मर्डर क्रॉनिकल' या इंग्रजी कादंबरीने क्रॉसवर्ल्ड बेस्ट सेलर यादीत स्थान पटकावले आहे.
मानसी सप्रे या मूळच्या सांगलीच्या. त्यांचे वडील प्रा. अविनाश सप्रे हे वाङ्मयसमीक्षक आहेत. आईचे नाव प्रतिमा सप्रे. या दोघांनीही मानसीची लहानपणापासूनची साहित्य आणि माध्यमांची आवड जपली आणि तिच्या निर्णयांना सातत्याने प्रोत्साहन दिले.
शिक्षण
मानसीने दहावीपासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वाचनाच्या माध्यमातून पैलू पाडायला सुरुवात केली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून दहावीला ९० टक्के गुण मिळविलेल्या मानसी अकरावीसाठी पुण्यात आल्या; त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. इंग्रजीत बी.ए. करताना मानसी सप्रे यांचा पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक आला. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी, इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असतानाही, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयूत) प्रवेश मिळवला व उच्च शिक्षणाची स्कॉलरशिपही प्राप्त केली.
साहित्याचे चौफेर वाचन आणि माध्यमांचे आकर्षण यातून मानसी सप्रे यांनी जेएनयूमध्ये असताना ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झॅमिनेशन दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. नंतर त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये मीडिया मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम दॊन वर्षात पूर्ण केला.. याच काळात त्यांना रिसर्च असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे खर्चाची फिकीरही करावी लागली नाही.
व्यवसाय
भारतात आल्यावर मानसी सप्रे यांनी हैदराबादेत ईटीव्हीमध्ये प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून काम केले. त्यावेळी टेलिफिल्म आणि सीरिअल्ससाठी लेखन ते निर्मिती या टप्प्यावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडता आल्या. अशाच कामासाठी त्या मुंबईत यूटीव्हीमधील कोअर लीडरशिपमध्ये काम करू लागल्या. तिथे मानसी सप्रे यांनी आशय आणि सादरीकरणाच्या पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सिनेमा आणि चॅनल्सवरील कोणतीही मालिका असली तरी त्यात काही ना काही कंटेंट, मेसेज आणि कुणासाठी तरी मोटिव्हेशन असतेच, असे त्यांचे मत आहे.
सध्या त्या (इ.स. २०१५)इंग्लंडमधील लेबारा टेलिकम्युनिकेशन कंपनीत भारतीय उपखंडाच्या कंटेंट हेड आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय मुंबईत असले तरी कामानिमित्त त्यांची जगभर भ्रमंती सुरू असते.
पुणे मर्डर क्रॉनिकल
मानसी सप्रे यांची 'पुणे मर्डर क्रॉनिकल' ही बहुचर्चित कादंबरी वरवर पाहता पुण्याच्या पार्श्वभूमीवरील मर्डर मिस्ट्री आहे. परंतु पुण्यासारखे शहर, त्याचे वेगाने होणारे औद्योगिकीकरण व एका शहराची महानगराकडे वाटचाल होताना त्याच्या अंतरंगात होणारे बदल, आणि त्यातून जे धोके समोर येतात, ते या कादंबरीत आहेत. त्या अर्थाने ही पॉप्युलर फिक्शन असली तरी पॉप्युलर आणि क्लासिक ही सीमारेषा पुसून टाकणारी कादंबरी आहे.
कॉर्पोरेट सेक्टर आणि माध्यमांत काम करणाऱ्या मानसी सप्रेंनी या कादंबरीसाठी खूप कष्ट घेतले. तपशील अचूक राहावेत यासाठी काही पोलीस अधिकारी, तसेच पत्रकारांसोबत काम केले. आपण लिहिलेले जगभर जाणार आहे, याचे भान त्यांना होते, त्यासाठी जरूर ते सर्व त्यांनी केले. जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचावे, म्हणून मानसीने इंग्रजीतून लिहिण्याचा पर्याय निवडला.
(अपूर्ण)