"स्वाती सु. कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* स्त्रियांची शतपत्रे |
* स्त्रियांची शतपत्रे |
||
* स्त्री विकासाचे नवे क्षितिज |
* स्त्री विकासाचे नवे क्षितिज |
||
* स्त्री विकासाच्या पाऊलखुणा |
* स्त्री विकासाच्या पाऊलखुणा |
||
== लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या ग्रंथाचे अनिल बळेल यांनी केलेले परीक्षण== |
|||
लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू एवढंच, असा समज असेल तर तो चुकीचा आहे. ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे- अगदी मुळापासून. तिचा मुळापासूनच म्हणजे १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी शिरस्तेदार लिहिली तेव्हापासूनच वेध घेण्याचा प्रयत्न कर्वे यांनी या ग्रंथात केला आहे. व्यक्ती आणि समाज यांचं यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधलं गेलं होतं. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसं कसं विकसित होत गेलं हेच लेखिकेने यात मांडलं आहे. लक्ष्य जरी लघुकादंबरीचं असलं तरी त्यासाठीच लघुकथा, दीर्घकथा आणि कादंबरी आपल्याला विचारात घ्यावीच लागणार याचंही भान लेखिकेला आहे. आणि वाचकांच्या मनावर ते यथार्थपणे बिंबवावं म्हणून कथात्म साहित्याची वर्णनपर तालिका, आणि एवढंच नाही, तर प्रत्येकाची घटकनिहाय तालिकाच इथे सादर करण्यात आली आहे. |
|||
कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असं म्हणण्यानेच खरं म्हणजे जाणकार वाचकाच्या मनात त्यातील भेद लक्षात येतो. पण जिथे खुद्द लेखकाचीच द्विधा मन:स्थिती होते तिथे वाचकांचं काय? निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही ह. मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि सुविद्य प्रकाशकानेही कादंबरी म्हटलं. काळा सूर्य या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असंच. त्याबाबतचा कर्वे यांनी केलेला ऊहापोह साहित्य अभ्यासूंच्या ज्ञानात भर टाकणारा आहे. |
|||
हे आहे तरी काय गौडबंगाल? असं म्हणत आपण कर्वे यांनी त्याचा केलेला उलगडा वाचत वाचत शेवटापर्यंत गेलो तर शेवटचा चौथा सूची विभाग येतो. या विभागात शिरके गणपतराव, सद्गुणी स्त्री... आपटे ना. ह. यांच्यापासून हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंब-यांची नामावली येते. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंब-या कळतात. तसंच दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आढळते. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, असा उलगडा झाल्यावर आपल्यालाही आतलं गौडबंगाल लक्षात येतं. वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावर सविस्तरपणे लिहिल्यानेही कर्वे यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे लक्षात येतं. |
|||
जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचं चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचं, संघर्षाचं भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी, वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूह जीवनाचं चित्र उभं करीत असतो; जो अधिक विस्तार करीत अनेक स्तरांवर जात नाही परंतु आपल्या मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचं चित्र उभं करीत असतो. असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी. अशा विविध व्याख्या कर्वे यांनी जशा या लेखनप्रकाराच्या दिल्या आहेत, तसेच त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे, की लघुकादंबरी असा निर्देश होऊन मराठी कादंबरीक्षेत्रात एक नवा लेखनप्रकार आलेला आहे तो केवळ आकाराने लहान म्हणून लघुकादंबरी नाही. इतर साहित्यप्रकार ज्याप्रमाणे जीवनदर्शनाचं एक माध्यम आहेत. त्याप्रमाणे लघुकादंबरी हे जीवनदर्शनाचं एक माध्यम आहे. तिने आपलं स्वतंत्रपण सिद्ध केलं आहे. |
|||
अर्थात कोणताही विषय कधीच परिपूर्ण होत नाही. त्यात काहीसं अस्पर्शित राहतंच, याचीही कर्वे यांना जाणीव आहेच. |
|||
हा प्रस्तुत ग्रंथ मराठीतील वाङ्मयप्रकारांच्या विचारात महत्त्वाची भर टाकणारा, व्यासंगपूर्ण आणि सांगोपांग अभ्यास दर्शवणारा समाधानकारक प्रयत्न आहे. या ग्रंथाची मांडणी, विवेचन, संशोधन पद्धती आणि अभ्याससामग्री हे सर्व घटक अस्खलित असून डॉ. स्वाती कर्वे यांची एकूण निर्णय घेण्याची पद्धती अत्यंत समतोलच, असं भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकाबद्दल म्हटलं आहे. त्यातच पुस्तकाचं महत्त्व अधोरेखित होते. |
|||
==डॉ. स्वाती सु. कर्वे यांना मिळालेले पुरस्कार== |
==डॉ. स्वाती सु. कर्वे यांना मिळालेले पुरस्कार== |
१५:२०, १८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
डॉ. स्वाती सु. कर्वे या एक मराठी लेखिका आहेत.
स्वाती सु. कर्वॆ यांनी लिहिलेली पुस्तके
- १०१ कर्तृत्ववान स्त्रिया
- गंधर्वगाथा
- दशावतार सप्तचिरंजीव - पंचकन्या
- दळवींची नाटके : एक अंतर्वेध
- भारतीय सण आणि उत्सव
- लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप
- सकाळः वृत्तपत्र आणि वृत्तपत्र समूह
- सृजनरंग
- सोळा संस्कार
- स्त्रियांची शतपत्रे
- स्त्री विकासाचे नवे क्षितिज
- स्त्री विकासाच्या पाऊलखुणा
लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या ग्रंथाचे अनिल बळेल यांनी केलेले परीक्षण
लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू एवढंच, असा समज असेल तर तो चुकीचा आहे. ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे- अगदी मुळापासून. तिचा मुळापासूनच म्हणजे १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी शिरस्तेदार लिहिली तेव्हापासूनच वेध घेण्याचा प्रयत्न कर्वे यांनी या ग्रंथात केला आहे. व्यक्ती आणि समाज यांचं यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधलं गेलं होतं. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसं कसं विकसित होत गेलं हेच लेखिकेने यात मांडलं आहे. लक्ष्य जरी लघुकादंबरीचं असलं तरी त्यासाठीच लघुकथा, दीर्घकथा आणि कादंबरी आपल्याला विचारात घ्यावीच लागणार याचंही भान लेखिकेला आहे. आणि वाचकांच्या मनावर ते यथार्थपणे बिंबवावं म्हणून कथात्म साहित्याची वर्णनपर तालिका, आणि एवढंच नाही, तर प्रत्येकाची घटकनिहाय तालिकाच इथे सादर करण्यात आली आहे. कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असं म्हणण्यानेच खरं म्हणजे जाणकार वाचकाच्या मनात त्यातील भेद लक्षात येतो. पण जिथे खुद्द लेखकाचीच द्विधा मन:स्थिती होते तिथे वाचकांचं काय? निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही ह. मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि सुविद्य प्रकाशकानेही कादंबरी म्हटलं. काळा सूर्य या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असंच. त्याबाबतचा कर्वे यांनी केलेला ऊहापोह साहित्य अभ्यासूंच्या ज्ञानात भर टाकणारा आहे.
हे आहे तरी काय गौडबंगाल? असं म्हणत आपण कर्वे यांनी त्याचा केलेला उलगडा वाचत वाचत शेवटापर्यंत गेलो तर शेवटचा चौथा सूची विभाग येतो. या विभागात शिरके गणपतराव, सद्गुणी स्त्री... आपटे ना. ह. यांच्यापासून हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंब-यांची नामावली येते. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंब-या कळतात. तसंच दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आढळते. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, असा उलगडा झाल्यावर आपल्यालाही आतलं गौडबंगाल लक्षात येतं. वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावर सविस्तरपणे लिहिल्यानेही कर्वे यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे लक्षात येतं.
जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचं चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचं, संघर्षाचं भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी, वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूह जीवनाचं चित्र उभं करीत असतो; जो अधिक विस्तार करीत अनेक स्तरांवर जात नाही परंतु आपल्या मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचं चित्र उभं करीत असतो. असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी. अशा विविध व्याख्या कर्वे यांनी जशा या लेखनप्रकाराच्या दिल्या आहेत, तसेच त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे, की लघुकादंबरी असा निर्देश होऊन मराठी कादंबरीक्षेत्रात एक नवा लेखनप्रकार आलेला आहे तो केवळ आकाराने लहान म्हणून लघुकादंबरी नाही. इतर साहित्यप्रकार ज्याप्रमाणे जीवनदर्शनाचं एक माध्यम आहेत. त्याप्रमाणे लघुकादंबरी हे जीवनदर्शनाचं एक माध्यम आहे. तिने आपलं स्वतंत्रपण सिद्ध केलं आहे. अर्थात कोणताही विषय कधीच परिपूर्ण होत नाही. त्यात काहीसं अस्पर्शित राहतंच, याचीही कर्वे यांना जाणीव आहेच.
हा प्रस्तुत ग्रंथ मराठीतील वाङ्मयप्रकारांच्या विचारात महत्त्वाची भर टाकणारा, व्यासंगपूर्ण आणि सांगोपांग अभ्यास दर्शवणारा समाधानकारक प्रयत्न आहे. या ग्रंथाची मांडणी, विवेचन, संशोधन पद्धती आणि अभ्याससामग्री हे सर्व घटक अस्खलित असून डॉ. स्वाती कर्वे यांची एकूण निर्णय घेण्याची पद्धती अत्यंत समतोलच, असं भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकाबद्दल म्हटलं आहे. त्यातच पुस्तकाचं महत्त्व अधोरेखित होते.
डॉ. स्वाती सु. कर्वे यांना मिळालेले पुरस्कार
- पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे - डॉ. स्वाती कर्वे यांच्या ’लघुकादंबरीचे साहित्यरूप’ या ग्रंथाला, डॉ. ह.वि. इनामदार पुरस्कार.