Jump to content

"जयंत बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयंत बेंद्रे (मृत्यू : पुणे, २३ मार्च, २०१५) हे एक मराठी अभिनेते आणि...
(काही फरक नाही)

१९:०८, २४ मार्च २०१५ ची आवृत्ती

जयंत बेंद्रे (मृत्यू : पुणे, २३ मार्च, २०१५) हे एक मराठी अभिनेते आणि लेखक होते.

बेंद्रे यांचे शिक्षण नगर येथे झाले. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्यासह त्यांनी काम केले होते. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना अभिनेते मोहन जोशी यांच्यासह त्यांनी औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. बेंद्रे यांचे 'मोरूची मावशी'तले काम बरेच गाजले होते. जयंत बेंद्रे हे विविध नाट्य संस्थांशी जोडलेले होते.

मोहन जोशी यांच्या ’नटखट नट-खट’ या ५०० पानी आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले.

सामाजिक कार्य

जयंत बेंद्रे हे अभिनेते मोहन जोशी यांचे खास मित्र होत. त्यांच्या आणि जयंत बेंद्रे, राजन मोहाडीकर, श्रीराम रानडे यांच्या मैत्रीला १९९८ साली २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून या चौघांनी 'मैत्री' या ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या संस्थेचे बोधवाक्य आहे … 'जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले’. या संस्थेद्वारे जयंद्र बेंद्रे हे सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते.

जयंत बेंद्रे यांनी लिहिलेली पुस्तके

  • समुद्र बिलोरी ऐना (कथासंग्रह - २०११)
  • शब्दासंगे संवादू (कथासंग्रह)
  • सात एकांकिका
    • उद्या पुन्हा हाच खेळ
    • खेळ मांडियेला
    • निर्मितीकार
    • भुतासकी
    • मॅड मॅड मॅड फॉर ईच अदर
    • मुकी बिचारी कुणीही हाका
    • रुपयाभोवती दुनिया
  • Ye Kya Ho Raha Hai (इंग्रजी एकांकिका)

जयंत बेंद्रे यांना मिळालेले पुरस्कार

  • मुंबईतील साहित्य दरवळ मंचतर्फे देण्यात आलेला. जयवंत दळवी स्मृती पुरस्कार. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.. (१२-७-२००९)