"संथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →संथा म्हणणे |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
==वेदाध्ययनातील संथा== |
==वेदाध्ययनातील संथा== |
||
वेदाध्ययनातील संथा देणे म्हणजे वेदपाठशाळेमध्ये वेद शिकविणारे गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना वेदमंत्राचे छोटे तुकडे पाडून, त्यांच्या मागे (७वेळा) घोकायला/म्हणायला सांगतात. याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते.<ref name="मिपा_१"> {{संकेतस्थळ स्रोत |
मराठी विश्वकोशात शिक्षण पद्धतीचा परिचय करून देताना लेखक रा.म.मराठे यांच्या मतानुसार प्राचीन भारतात ग्रंथ कंठस्थ करण्याची विशिष्ट पद्धत होती; वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई.<ref name="रा.म.मराठे">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand1/index.php/khand1-suchi/23-2015-02-10-05-12-54/1494-2010-12-22-11-27-38?showall=&start=1| शीर्षक = अध्यापन व अध्यापनपद्धति (खंड १) | भाषा = मराठी| लेखक = रा.म.मराठे यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.in) |अॅक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील अध्यापन व अध्यापनपद्धति -रा.म.मराठे यांचा लेख दिनांक १७ मार्च २०१५ भाप्रवे सायंकाळी ५ वाजता}}</ref> तर पराग दिवेकर यांच्या "वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय?" या लेखातील व्याख्येनुसार वेदाध्ययनातील संथा देणे म्हणजे वेदपाठशाळेमध्ये वेद शिकविणारे गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना वेदमंत्राचे छोटे तुकडे पाडून, त्यांच्या मागे (७वेळा) घोकायला/म्हणायला सांगतात. याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते.<ref name="मिपा_१"> {{संकेतस्थळ स्रोत |
||
| दुवा = http://www.misalpav.com/node/30023 |
| दुवा = http://www.misalpav.com/node/30023 |
||
| शीर्षक = वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय? |
| शीर्षक = वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय? |
१७:३९, १७ मार्च २०१५ ची आवृत्ती
संथा हा शब्द मराठी भाषेत वेगवेगळ्या अर्थच्छटांनी वापरला जातो. गुरूकडून दीक्षा घेणे; आदर्श कार्यास/उद्दिष्टास/ध्येयास व्रत असल्याप्रमाणे अंगीकारणे; पाठ करण्याची (पठणाची)/ (लक्षात ठेवण्यासाठी) क्रिया, पाठाचे आवर्तन करण्याची क्रिया इत्यादीं अर्थच्छटांचा यात समावेश होतो. भारतातील विविध वेदादी पारंपरिक ग्रंथ विद्यार्थ्यांकडून मुखोद्गत करून घेण्याच्या पद्धतीसही संथा असे म्हटले जाते.
वेदाध्ययनातील संथा
मराठी विश्वकोशात शिक्षण पद्धतीचा परिचय करून देताना लेखक रा.म.मराठे यांच्या मतानुसार प्राचीन भारतात ग्रंथ कंठस्थ करण्याची विशिष्ट पद्धत होती; वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई.[१] तर पराग दिवेकर यांच्या "वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय?" या लेखातील व्याख्येनुसार वेदाध्ययनातील संथा देणे म्हणजे वेदपाठशाळेमध्ये वेद शिकविणारे गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना वेदमंत्राचे छोटे तुकडे पाडून, त्यांच्या मागे (७वेळा) घोकायला/म्हणायला सांगतात. याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते.[२]
संथा म्हणणे
विद्यार्थ्यांनी संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला संथा घालणे अगर संथा म्हणणे असे म्हणतात.[२] एखादा विषय / याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे १) चरणाची संथा २) अर्धनीची संथा ३) ऋचेची संथा ४) गुंडिकेची संथा हे चार टप्पे असतात. [२]
१) चरणाच्या पहिल्या संथेत, गुरुजी प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण (तुकडा) दोनदा सांगतात. विद्यार्थी (पोथीत बघून) तो गुरुजींच्या मागून सात वेळा घोकतात. यात म्हणताना चूक झाली तर, सुरुवातीपासून पुन्हा म्हणतात. यात शुद्ध अक्षर, जोडाक्षर, त्याचे गुरुत्व, अनुस्वारांचे उच्चार, स्वराघात, र्हस्व व दीर्घ/प्रदीर्घ स्वर, विसर्ग (आणि त्यांचे तसेच उच्चार) वगैरे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत, हे गुरुजी ऐकून, कसून तपासतात. हे वेदमंत्राचे पाडलेले एकेक चरण, सात वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र पूर्ण केले जाते. अश्या चार संथा' झाल्या की चरण' पूर्ण होतो. मंत्र आणि उच्चारणात अशुद्धी राहू नयेत म्हणून सगळी संथा गुरुजींसमक्षच होते. [२]
२) अर्धनीच्या संथेत, सामान्यतः मंत्राची अर्धी ओळ (म्हणजे २ चरण एकत्र) सात वेळा म्हटली जाते. आधी चरण पाठ झालेला असेल तर गुरुजी समोर नसले तरी चालते. एकामागून एक अर्धी ओळ पूर्ण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय पूर्ण केला की अर्धनीची १ संथा होते. याचप्रमाणे पुढे अजून ३ संथा म्हटल्यानंतर या अर्धनीच्या चार संथा पुर्या होतात.[२]
३) ऋचेच्या संथेत, मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरू होतो. म्हणजे २ ओळींची संपूर्ण ऋचा, अधिक पुढच्या ऋचेचा पहिला चरण ..,तसे ७ वेळा म्हणतात. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण घेण्याचे कारण असे की, यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक ऋचेची पाठोपाठ येणार्या ऋचेशी गुंफण तयार होते.
अशुद्धी आली किंवा नंतर तयार झालेली असल्यास लक्षात यावे म्हणून ऋचेच्या (पहिल्या) संथेवर, शिकविणार्या गुरुजींचे (पुन्हा..) बारीक लक्ष असते. ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हटल्या नंतर या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात. [२]
४) गुंडिकेची संथा हा शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. आता मागे सांगितलेल्या ऋचेच्या संथेनी हिचे निम्मे काम- (गुंफणीद्वारे) केलेले असते. पण तरीही.., आता कितीही पाठ येत असले, तरी संथेतील पहिल्या ओळीपासून पोथीत पाहूनच सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७ वेळा म्हणून तो सगळा अध्याय पूर्ण करतात. ही झाली गुंडिकेची पहिली संथा. अश्या अजून तीन म्हणून, ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करतात.
संथेत म्हटलेले सर्व चरण मुखोद्गत झाले आहेत याची खात्री करण्याच्या दृष्टीने गुंडिकेची संथा चालू असताना, साधारणपणे दुसर्या किंवा तिसर्या संथेपासून, विद्यार्थ्याची इच्छा अगर तयारी नसली तरी विद्यार्थ्यांना पोथीत न पहाताच, मान वर करून संथा म्हणावी लागते. कोणत्याही सर्वसामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्याला यांतल्या शेवटच्या २ संथांमधे या पाठांतर पद्धतीमुळे, सर्वकाही बिनचूक तोंडपाठ येते. पण एखादे वेळी काही कमजोर विद्यार्थ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की विद्यार्थ्याकडून अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय तयार होतो. [२]
संदर्भ
- ^ रा.म.मराठे यांचे. http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand1/index.php/khand1-suchi/23-2015-02-10-05-12-54/1494-2010-12-22-11-27-38?showall=&start=1. मराठी विश्वकोशावरील अध्यापन व अध्यापनपद्धति -रा.म.मराठे यांचा लेख दिनांक १७ मार्च २०१५ भाप्रवे सायंकाळी ५ वाजता रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ a b c d e f g [पराग पुरुषोत्तम दिवेकर]. धागा लेख आणि (प्रतिसाद # भृशुंडी) http://www.misalpav.com/node/30023. Unknown parameter
|अॅक्सेसमहिनादिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Check|लेखकदुवा=
value (सहाय्य); Check|लेखकदुवा=
value (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)