Jump to content

"यशवंत देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५६: ओळ ५६:
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर [[पुरस्कार]]. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या [[पुरस्कार|पुरस्काराचे]] स्वरूप आहे.
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर [[पुरस्कार]]. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या [[पुरस्कार|पुरस्काराचे]] स्वरूप आहे.
* गदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा [[पुरस्कार]]
* गदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा [[पुरस्कार]]
* शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (१९-२-२०१५)


==संदर्भ==
==संदर्भ==

२३:३५, ५ मार्च २०१५ ची आवृत्ती

यशवंत देव
आयुष्य
जन्म १ नोव्हेंबर, इ.स. १९२६
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार मराठी भाषेतील संगीतकारपार्श्वगायक.
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

बालपण

यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

कारकीर्द

आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. १) जीवनात ही घडी अशीच राहू दे २) श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे ३) अशी धरा असे गगन कधी दिसेल का? ४) कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे ५) तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी ६) प्रिया आज माझी नसे साथ द्याया ७) स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी ८)अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात ९) अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत.

यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.

  • आजवर यशवंत देव यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • गदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा पुरस्कार
  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (१९-२-२०१५)

संदर्भ

बाह्य दुवे