Jump to content

"मीरा कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मीरा कोसंबी (जन्म : २४ एप्रिल १९३९; मृत्यू : पुणे, २६ फेब्रुवारी...
(काही फरक नाही)

१६:२१, २८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

डॉ. मीरा कोसंबी (जन्म : २४ एप्रिल १९३९; मृत्यू : पुणे, २६ फेब्रुवारी २०१५) या एक मराठी लेखिका आणि प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी (डी.डी. कोसंबी) हे इतिहासतज्ज्ञ आणि मोठे गणिती होते. मीराबाईंचे आजोबा आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि पाली भाषेचे उत्तम जाणकार होते.

डॉ. मीरा कोसंबी यांचे उच्च शिक्षण स्टॉकहोम विद्यापीठात झाले होते. १९व्या शतकातील प्रबोधनपर्व हा त्यांच्या पीएच.डीचा विषय होता. त्यापूर्वी त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकत होत्या.याच कॉलेजात पुढे त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी २० वर्षे स्वीडनमध्ये प्राध्यापकी केली. त्या अविवाहित होत्या.

स्त्रीसाहित्य आणि चळवळी या विषयांचाही त्यांचा अभ्यास होता. एसएनडीटी विद्यापीठातील स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या त्या प्रमुख होत्या. विविध विषयांवरील सुमारे १२ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

मीरा कोसंबी यांनी लिहिलेली पुस्तके

  • Bombay in transition
  • Crossing Thresholds: Feminist Essays in Social History
  • भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र (इंग्रजी)
  • पंडिता रमाबाई यांचे चरित्र (इंग्रजी)