मीरा कोसंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. मीरा कोसंबी (२४ एप्रिल, १९३९ - २६ फेब्रुवारी, २०१५) या एक मराठी लेखिका आणि प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी हे इतिहासतज्ज्ञ आणि मोठे गणिती होते. मीराबाईंचे आजोबा आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि पाली भाषेचे उत्तम जाणकार होते.

मीरा कोसंबी यांचे उच्च शिक्षण स्टॉकहोम विद्यापीठात झाले होते. १९व्या शतकातील प्रबोधनपर्व हा त्यांच्या पीएच.डीचा विषय होता. त्यापूर्वी त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकत होत्या. याच कॉलेजात पुढे त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी २० वर्षे स्वीडनमध्ये प्राध्यापकी केली. त्या अविवाहित होत्या.

स्त्रीसाहित्य आणि चळवळी या विषयांचाही त्यांचा अभ्यास होता. एसएनडीटी विद्यापीठातील स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या त्या प्रमुख होत्या. विविध विषयांवरील सुमारे १२ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. डॉ. मीरा कोसंबी यांनी अनेक संशोधनपर लेखनात एकाचवेळी अनेक विषयांचा सखोलतेने अभ्यास केला असल्याचे आढळून येते. `मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासशास्त्रज्ञ, भूगोलतज्‍ज्ञ आणि अर्थतज्‍ज्ञ’ या विषयांत त्यांचा संशोधनपर व्यासंग अव्याहतपणे चालत असे. एकाचवेळी अनेक विषयांवर होणारे त्यांचे बेफाट आणि अफाट वाचन हे संशोधक, पंडित आणि अभ्यासकांनाही अक्षरशः अवाक करणारे होते. या त्यांच्या संशोधनात भाषा, बोली, साहित्य, लोकसाहित्य हे विषय असतच. परंतु या विषयांची सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्येसुद्धा त्या अभ्यासून पाहत असत. त्यांच्या इंग्रजी आणि मराठी साहित्यात त्यांची लेखनशैली स्वतंत्रपणे उठून दिसते. `इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’साठी त्यांनी पुणे, मुंबई तसेच पंढरपूर वगैरे भागातील अनाथ मुलांवर केलेल लेखन खूपच संशोधनपर आणि माहितीपूर्ण आहे. हे संशोधन करता करता त्यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेमा तसेच अनेक चांगल्या साहित्यकृतींचाही दांडगा अभ्यास केलेला होता.

पुस्तके[संपादन]

 • Bombay in transition
 • Crossing Thresholds: Feminist Essays in Social History
 • Dharmanand Kosambi: The Essential Writings
 • Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema Before Independence
 • Intersections
 • Mahatma Gandhi and Prema Kantak: Exploring a Relationship, Exploring History
 • Nivedan: The Autobiography of Dharmanand Kosambi (मीरा कोसंबी यांचे संपादन आणि त्यांच्या टिपा)
 • Feminist Vision or Treason Against Men?: Kashibai Kanitkar and the Engendering of Marathi Literature
 • Pandita Ramabai's American Encounter
 • Pandita Ramabai's American Encounter: The Peoples of the United States (1889) (सहलेखिका पंडिता रमाबाई)
 • भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र (मूळ मराठीचे इंग्रजी भाषांतर)
 • पंडिता रमाबाई यांचे चरित्र (मूळ मराठीचे इंग्रजी भाषांतर)