"महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी १६ अनुदानित... खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
(काही फरक नाही)
|
००:०६, २५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी १६ अनुदानित आणि ६० खासगी कॉलेजे आहेत (इ.स. २०१५ची माहिती). या कॉलेजांतून दरवर्षी बी.ए.एम.एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अॅन्ड सर्जरी ही पदावी घेऊन सुमारे चार हजार डॉक्टर बाहेर पडतात. २०१५ साली महाराष्ट्रात ६० हजारहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
कमी खर्चिक
बीएएमएसचे शिक्षण घेण्यासाठी अॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत कमी खर्च आहे. एमबीबीएसच्या एका वर्षाला सुमारे ११ लाख रुपये खर्च येतो, त्या तुलनेत आयुर्वेदाच्या पदवीधराला पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अकरा लाख रुपयांच्या आसपास खर्च येतो. त्यामुळे हे शिक्षण तुलनेत कमी खर्चिक आहे. आयुर्वेद पदवीसाठी प्रवेश घेणार्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींचाही या शाखेकडे कल वाढल्याचे सांगण्यात येते
आयुर्वेदातील पदवी घेताना विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक शास्त्राचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यांच्यासाठी पॅथॉलॉजी, फार्माकॉलॉजी, रेडिओलॉजी, इन्व्हेस्टिगेशन, सर्जरी अशा विषयाचे अभ्यासक्रमही आहेत.
महाराष्ट्रातील आयुर्वेद डॉक्टरांची आरोग्यसेवा
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेमध्ये आयुर्वेद शाखेची पदवी घेणार्या (बीएएमएम) डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. १०८ या टेलिफोन क्रमांकावर उपलब्ध होणार्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स सर्व्हिसवर डॉक्टर म्हणून यांच्यापैकी काही डॉक्टर काम करतात. त्याशिवाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत बीएएमएस डॉक्टर आहेत. लहान खासगी हॉस्पिटलमध्ये आरएमओ म्हणून आयुर्वेद डॉक्टर जबाबदारी सांभाळतात. असे असले तरी आयुर्वेद हे अजूनही पर्यायी चिकित्सा पद्धती म्हणून ओळखले जाते. अनेक व्याधींवर अॅलोपॅथीमधील उपचारांचा गुण येत नाही तेव्हा अनेकजण नाईलाजाने आयुर्वेदाकडे वळतात.
इतर पर्याय
आयुर्वेदामध्ये पदवी घेतल्यानंतर सुमारे ७० टक्के डॉक्टर दवाखाना न उघडता वेगळे पर्याय शोधतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये या शाखेचे अनेक डॉक्टर आहेत. इन्शुरन्स कंपन्यांचे बॅक ऑफिस किंवा मेडिकल क्लेम मंजूर करण्याच्या कामाचा पर्याय या डॉक्टरांना उपलब्ध आहे. तर काहीजण क्लिनिकल रिसर्चमधील डिप्लोमा पूर्ण करून औषधांच्या संशोधनात करिअर करतात. काही पदवीधर यूपीएससी, एमपीएससीचा पर्याय निवडतात. पण त्यासोबत आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सुरूच असते.
हल्ली महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मसाज व पंचकर्म क्लिनिक मोठ्या संख्येने सुरू झाली आहेत. आयुर्वेदिक बुटिकचेही प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक औषधे वापरण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. त्यामुळे या शाखेची पदवी घेणार्या डॉक्टरांना नवीन व वेगळे क्षेत्र निर्माण झाले आहे.
जिम-फिटनेस सेंटरमध्ये आहारतज्ज्ञ म्हणून अनेकांना नवीन दालन खुले झाले आहे.
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध आयुर्वेदिक कॉलेजे
- मुंबईतील शीवचे (सायनचे) आयुर्वेदिक कॉलेज (स्थापना : २२-२-१९५५)
- आर्युवेदशास्त्र सेवा मंडळाचे, गंगाशास्त्री गुणे आर्युवेद महाविद्द्यालय, अहमदनगर
- पुण्याच्या आयुर्वेद रसशाळेचे कॉलेज
- पुण्याचे टिळक कॉलेज
(अपूर्ण)