"परवीन शाकिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २५: ओळ २५:
जिस संग भी फेरे डालती

जिस संग भी फेरे डालती

संजोग में थे घनश्याम
संजोग में थे घनश्याम

किंवा,

मेरे चेहरे पे ग़ज़्‍ाल लिखती रहीं

शेर कहती हुई आँखें उसकी

खामोशी कलाम कर रही है

जज्बात की मुहर है सुखन पर

(मौनातच संवाद करतेय. संभाषणावर भावनेची मोहर उमटली आहे.)

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

२३:२४, २३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

परवीन शाकिर ही (उर्दू : پروین شاکر) जन्म : कराची, नोव्हेंबर २४, इ.स. १९५२; मृत्यू : इस्लामाबाद, डिसेंबर २६, इ.स. १९९४) ही उर्दू कवयित्री, शिक्षिका व पाकिस्तान सरकारची नागरी प्रशासनात होती.

पाकिस्तानी गझलकार परवीन शाकिरचे वडील सय्यद शाकिर अली मूळचे बिहारमधील पाटण्याचे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संमिश्र संस्कृतीत वाढलेले त्यांचे घराणे असल्याने, अन्य उर्दू लेखकांप्रमाणे परवीनला देखील श्रीकृष्ण, गंगा इत्यादीबद्दल सश्रद्ध आत्मीयता होती. श्रीकृष्णांबद्दल लिहिताना तिने सुबोध भाषेचा अवलंब केला आहे. परवीन शाकिर जरी पाकिस्तानात जन्मली, वाढली तरी आईबडिलांकडून आलेले भारतीय संस्कार ती विसरली नाही.

परवीन शाकिर ही इंग्रजी साहित्य व भाषाशास्त्राची एम.ए. होती. तसेच तिने बँक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एम.ए. केले, पीएच.डी. घेतली व हॉर्वर्ड युनिव्हर्सटिीतून पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची मास्टरची डिग्रीही घेतली. पुढे ती नऊ वर्षांपर्यंत शिक्षिका होती.

१९७६ साली तिचा विवाह नात्यातील डॉ. नासीर अलीशी झाला. तिला मुलगा सय्यद मुराद अली झाल्यानंतर नवर्‍याशी झालेल्या वैचारिक मतभेदामुळे तिचा घटस्फोट झाला.

१९८२ मध्ये ती पाकिस्तानची सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसची परीक्षा पास झाली. १९८६ मध्ये ती इस्लामाबाद येथे सेकंड सेक्रेटरी या पदावर होती.

२६ डिसेंबर १९९४ रोजी कारने घरून कार्यालयाकडे जाताना बसशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिचे निधन झाले. [१]

परवीन शाकिरचे गझललेखन

लहान वयातच शाकिरने कविता रचण्यास सुरुवात केली. इ.स. १९७६ मध्ये खुश्बू (सुगंध) या तिच्या कवितांच्या पहिल्या खंडाचे जोरदार स्वागत झाले [२] त्यानंतर आलेल्या सद-बर्ग (दलदलीतील झेंडू), ख़ुद कलामी (स्वगत), इन्कार (नकार), कफे-आईना (आरशाचा काठ) या काव्यसंग्रहांबरोबरच गोशा-ए-चश्म (दृष्टीचा कोपरा) या तिच्या वृत्तपत्रीय लेखनाच्या संग्रहाचेही जोरदार स्वागत झाले. कफे-आईना या संग्रहाव्यतिरिक्त शाकिरच्या सर्व रचना माहे-तमाम (पूर्णचंद्र) या पुस्तकात एकत्र करण्यात आल्या आहेत.

परवीन म्हणजे आकाशगंगा, अन् शाकिर म्हणजे कृतज्ञ. परवीनच्या ग़ज़्‍ालात व कवितेत तरल भावनांच्या तारकापुंजच दृष्टीस पडतो. अन् कृतज्ञता तर तिच्या समग्र काव्यातून जाणवते.

घटस्फोटानंतर परवीनला जीवनात, जे एकाकी तरुणीला येतात तेच अनुभव आले. पतीपासून विभक्त होऊनही ती त्याच्या प्रेयसी रूपातच गझलेत साकारत राहिली. तिच्या काव्यातील या ओळी हेच सांगतात. :-
तू है राधा अपने कृष्ण की
तेरा कोई भी होता नाम
मुरली तेरे भितर बजती
किसी बन करती विराम
या कोई सिंहासन बिराजती
तुझे खोज ही लेते श्याम
जिस संग भी फेरे डालती
संजोग में थे घनश्याम

किंवा,
मेरे चेहरे पे ग़ज़्‍ाल लिखती रहीं
शेर कहती हुई आँखें उसकी
खामोशी कलाम कर रही है
जज्बात की मुहर है सुखन पर
(मौनातच संवाद करतेय. संभाषणावर भावनेची मोहर उमटली आहे.)

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे