Jump to content

"शिराळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:


== भौगोलिक ==
== भौगोलिक ==
शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढ‍उतारावरती आहे. मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान या गावाचे आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणाऱ्या मोरणा नदीचा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.
शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढ‍उतारावरती आहे. या गावाचे मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणार्‍या [[मोरणा नदी]]चा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.


== धार्मिक ==
== धार्मिक ==
ओळ ६४: ओळ ६४:


== औद्योगिक ==
== औद्योगिक ==
शिराळा MIDC मध्ये औद्योगिक प्रगती सुरू आहे. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत.
गावातील MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल अॅन्ड डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन)मध्ये छोटेछोटे औद्योगिक कारखाने आहेत.. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत.
तसेच 'विराज अल्कोहोल' हीसुद्धा एक मोठी कंपनी असून इथेही बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे.
'विराज अल्कोहोल' ही येथील एक मोठी कंपनी असून इथेही बर्‍याच लोकांना रोजगार मिळाला आहे.


== विशेष परिचीत व्यक्ती ==
== विशेष परिचित व्यक्ती ==
===== राजकीय =====
===== राजकीय =====
{| class="wikitable"
{| class="wikitable"

२३:०७, १९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

शिराळा
जिल्हा सांगली जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या (शहर) २८,६७९
(२००१)
दूरध्वनी संकेतांक ०२३४५
टपाल संकेतांक ४१५-४०८
वाहन संकेतांक MH-10
संकेतस्थळ http://www.sangli.nic.in


शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते.

शिराळा गाव स्थान

शिराळा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाघवाडी, इटकरे फाटा व पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई पासून ३५० किलोमीटरवर, सांगली पासून ६० किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.

भौगोलिक

शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढ‍उतारावरती आहे. या गावाचे मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणार्‍या मोरणा नदीचा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.

धार्मिक

मंदिरे

  • गणपती मंदिर
  • गुरुदेव दत्त मंदिर
  • गोरक्षनाथ मंदिर
  • ग्रामदैवत अंबामाता मंदिर
  • नृसिंह मंदिर
  • महादेव मंदिर
  • मारुती मंदिर (समर्थ रामदास स्थापित)
  • राम मंदिर
  • लक्ष्मी नारायण मंदिर
  • विठ्ठल रुक्मिणी मंदिर
  • शनिदेव मंदिर

गावातील रहिवाशांची जातनिहाय आडनावे

  • बलुतेदार - आवटे, इंगवले, कबाडे, कांबळे, कार्वेकर, काशीद, कासार, कुंभार, खुर्द, गरगटे, गोसावी, घाडगे, चित्तूरकर, टिळे, तेली, दिवटे, देसाई, परीट, पोटे, बांदल, भोगावकर, माळी, मिरजकर, मुंडे, मुळे, यादव, रसाळ, लोहार, वडार, शेटे, सवाईराम, सातपुते, साळवी, सुतार, सोनटक्के, इत्यादी.
  • ब्राह्मण - अनगळ, इनामदार, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, नवांगुळ, बिळासकर, महाजन, हसबनीस, इत्यादी.
  • मराठा - इंगवले, इनामदार देशमुख, जाधव, उबाळे, नलावडे, कदम, काळे, कुरणे, कोतवाल, खबाले, गायकवाड, थोरबोले, थोरात, दुबुले, देशमुख पाटील, धुमाळ, नलवडे, नाईक, नांगरे, निकम, पवार, पाटील, भोसले, यादव, शिंदे, शिंदे सरकार, शेणेकर, शेळके, सुरले, सुर्वे, इत्यादी.
  • मुसलमान - आत्तार, काझी, दिवाण, नदाफ, पठाण, पिरजादे, मणेर, मुजावर, मुल्ला, मोमीन, शेख, सय्यद, मुंडे इत्यादी.
  • इतर - आंबर्डेकर, आलेकर, उजगरे, ओसवाल, कनोजे, काकडे, कानकात्रे, कुऱ्हाडे, कोळी, कोळेकर, खिंवसरा, गाढवे, गांधी, घाशी, चव्हाण, चिकुर्डेकर, डांगे, घोडे, त्रिपाठी, दिलवाले, देशमाने, धस, मुळीक, पटेल, परदेशी, पवळ, पारेख, बांदिवडेकर, बिचकर, भालेकर, रणदिवे, विभूते, शहा, सरकाळे, सावंत, सूर्यवंशी, हिरवाडेकर, इत्यादी.

ऐतिहासिक

शिराळा या गावाला फार मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथे असणारा भुईकोट किल्ला. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोराक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच 'बत्तीस शिराळा'... छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.

शिराळ्यामध्ये वर्षाकाठी महत्त्वाच्या २ यात्रा भरतात, एक नागपंचमीची आणि दुसरी गोरक्षनाथांची. तसेच १२ वर्षातून एकदा महायात्रा भरते. उत्तरेतून कुंभ मेळ्यातील सगळे साधू नाथांच्या दर्शनाला येतात तेव्हा ही खूप मोठी यात्रा भरते. शिवाय प्रत्येक एकादशीला एक छोटी यात्रा भरते.

राजकीय

शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती- शिवाजीराव देशमुख (सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र मानसिंगराव नाईक (आमदार, शिराळा विधानसभा मतदार संघ), शिवाजीराव नाईक (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), जयवंतराव देशमुख (तालुकाध्यक्ष - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

औद्योगिक

गावातील MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल अॅन्ड डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन)मध्ये छोटेछोटे औद्योगिक कारखाने आहेत.. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत. 'विराज अल्कोहोल' ही येथील एक मोठी कंपनी असून इथेही बर्‍याच लोकांना रोजगार मिळाला आहे.

विशेष परिचित व्यक्ती

राजकीय
नाव पक्ष संपर्क
मा. मानसिंगराव फत्तेसिंग नाईक राष्ट्रवादी काँग्रेस
मा. सत्यजित शिवाजीराव देशमुख (भाऊ) सरचिटणीस, महाराष्ट् प्रदेश काँग्रेस
मा. शिवाजीराव यशवंतराव नाईक माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. राजवर्धन मानाजीराव देशमुख भाजप युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष
मा. प्रताप बाबुराव पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस
अविनाश खोत म. न. से.
संतोष हिरुगडे शिवसेना
सामाजिक
शासकीय
नाव पद
विजया जाधव तहसीलदार
स्नेहल बर्गे प्रांताधिकारी
अनिल गुज्जर फौजदार
हसन मुलाणी सर्कल
------- तलाठी
------- ग्रामसेवक
गजानन सोनटक्के सरपंच
------- पोलीस पाटील

वैशिष्ट्य

हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकर्‍यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.