"आगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.[http://prahaar.in/mahamumbai/thane/176542] |
ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.[http://prahaar.in/mahamumbai/thane/176542] |
||
मुंबईतही एकूण लोकसंख्येच्या अंदाजे |
मुंबईतही एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ३० टक्क्यांहून अधिक आगरी समाजाची लोकसंख्या आहे. (शक्य नाही. मुंबईत मराठी माणसांची संख्याही तितकी नाही.) |
||
;आगरी समाजाच्या पोटजाती : |
;आगरी समाजाच्या पोटजाती : |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
;बारा, चौदा, बावन्न पाटील (?) : |
;बारा, चौदा, बावन्न पाटील (?) : |
||
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा, ठाकूरवाडी, बाणमोळी, नायगाव, वडाळा, माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन), शीव, माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी, चिंचबंदर, भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले. गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, गवाण, माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसं प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ आणि त्यानंतर माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ आणि बीएआरसी |
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा, ठाकूरवाडी, बाणमोळी, नायगाव, वडाळा, माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन), शीव, माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी, चिंचबंदर, भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले. गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, गवाण, माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसं प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ आणि त्यानंतर माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा अॅटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. |
||
आगरी बांधवांच्या गावात मधोमध मरीआईचे देऊळ असते. सोबत हनुमान, विठ्ठल, राम, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात. वाघेश्वरी, जाखमाता, बापदेव, खंडोबा, बाहेरी भवानी ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात आगरी बांधव नाचतात. गोविंदाही जोशात खेळतात. |
आगरी बांधवांच्या गावात मधोमध मरीआईचे देऊळ असते. सोबत हनुमान, विठ्ठल, राम, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात. वाघेश्वरी, जाखमाता, बापदेव, खंडोबा, बाहेरी भवानी ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात आगरी बांधव नाचतात. गोविंदाही जोशात खेळतात. |
२३:१६, १३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
आगरी माणसं (आगरी समाज)
ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.[१]
मुंबईतही एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ३० टक्क्यांहून अधिक आगरी समाजाची लोकसंख्या आहे. (शक्य नाही. मुंबईत मराठी माणसांची संख्याही तितकी नाही.)
- आगरी समाजाच्या पोटजाती
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९११मध्ये आगरी लोकांची जनसंख्या ठाणे जिल्ह्यात ९६ हजार ५४८, तर कुलाबा जिल्ह्यात १ लाख १६ हजार ७११ एवढी होती. आगरी समाजाच्या तीन पोटजाती. शुद्ध आगरी, दास आगरी आणि वरप आगरी. शुद्ध आगरी म्हणजे शुद्ध मीठ पिकविण्याची कला अवगत असलेले मूळ आगरी. दास आगरी प्रामुख्याने पालघर तालुक्यात आढळतात. तिथे त्यांना कराडे आगरीही म्हणतात. पण, ते मूळ आगरीच. आधी ख्रिस्ती धर्म स्वीकारून पुन्हा आगरी झालेले म्हणजे वरप आगरी. याशिवाय, ढोलवादन करणारे, नृत्य करणारे ढोल आगरी. ढोर मेहनत घेणारे ते ढोर आगरी. कमी मेहनत घेणारे ते सोन आगरी. अलिबाग तालुक्यात जे आगरी राहतात, त्यांना खारकी, खारपाटे म्हणतात. मीठ पिकविणार्या आगरी लोकांना खारवा म्हणतात. (सौराष्ट्रात मासे पकडणार्या लोकांना खारवा म्हणतात.)
- बारा, चौदा, बावन्न पाटील (?)
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा, ठाकूरवाडी, बाणमोळी, नायगाव, वडाळा, माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन), शीव, माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी, चिंचबंदर, भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले. गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, गवाण, माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसं प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ आणि त्यानंतर माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा अॅटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध मरीआईचे देऊळ असते. सोबत हनुमान, विठ्ठल, राम, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात. वाघेश्वरी, जाखमाता, बापदेव, खंडोबा, बाहेरी भवानी ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात आगरी बांधव नाचतात. गोविंदाही जोशात खेळतात.
माजी आमदार दत्ता पाटील, माजी खासदार दि.बा. पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ऍड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते. पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाई दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३७) यांच्यासह अनेक लहान-मोठय़ा संस्था मुंबईत कार्यरत आहेत. आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपरी-अलिबाग) यांना जातो. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.
[२]
- आगरी जातीचा इतिहास.
मुंबईच्या अगदी आधीच्या रहिवाशांपैकी एक आहेत. आगरी हा शब्दच मुळी आगार म्हणजे मिठाचे आगार किंवा शेताचे आगार ह्यावरून आला आहे. पौराणिक कथेनुसार, आगरी लोकांचे पूर्वज रावणाच्या दरबारात गायक होते. रावणाने त्यांना महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्याकडील भूमी दान केली व त्यांनंतर ते येथे स्थायिक झाले [३]
आगरी मंडळी येणेप्रमाणें सांगतातः- सुमारे ६०० वर्षांपूर्वी अलिबाग तालुक्यांत तीन लहान लहान राज्ये होती. एक चौलास, दुसरें आवास सासवणे येथे व तिसरे सागरगड येथे. चौल व आवास येथे हिंदू राज्ये होती व सागरगडावर दिल्लीच्या बादशहाच्या वतीने मुसलमान सरदार रहात असून तो दोन्ही हिंदू राज्यांजवळून कर वसूल करून तो दिल्लीस पाठवी. पुढे सागरगडावरील मुसलमान सरदार बलाढ्य होऊन दिल्लीस कर पाठवीनासा झाला व बादशहाचे हुकूम अमान्य करूं लागला. म्हणून दिल्लीच्या बादशहानें एक सरदार त्याच्या पारिपत्याकरितां पाठविला; परंतु त्यास यश न येतां तो दिल्लीस परत गेला. नंतर बादशहानें दुसरा सरदार पाठविण्याचे ठरवून मुंगीपैठणाचा मांडलिक राजा बिंब यास पत्र पाठवून दिल्लीहून येणाऱ्र्या सरदारास मदत करण्याविषयीं विनंती केली. राजा बिंब यानें ती विनंती मान्य करून तो आपलें सर्व सैन्य घेऊन ठरल्याप्रमाणें दिल्लीहून येणार्याया मुसुलमान सरदारास ठाण्याजवळ येऊन मिळाला. मुसलमान सरदाराने पश्चिमेच्या बाजूनें जाऊन गडावर स्वारी करावी, व लढाईस सुरुवात झाली म्हणजे राजानें आपले लोक घेऊन पूर्वेकडील बाजूनें गड चढून हल्ला करावा असें ठरलें होतें. त्याप्रमाणे दोघेहि चाल करून गेले. पश्चिमेच्या बाजूस लढाईस सुरुवात झाल्याबरोबर राजा बिंबाने आपल्या सर्व लोकांसह गड चढून छापा घातला; व गडावरील सरदारांचा मोड करून त्यास पकडून दिल्लीहून आलेल्या सरदाराबरोबर दिल्लीस पाठवून दिलें व आपण गडावर राहून राज्यकारभार पाहू्ं लागला. काही दिवसांनी त्यानें चौल व आबास सासवणें येथील राज्ये जिंकलीं. आसपास कोणी शत्रू नसल्यामुळें राजाने परत जाण्याचा बेत रहित करून तेथेंच कायमचे राज्य स्थापण्याचें ठरविलें. त्याच्या सैन्यासहि हा बेत पसंत पडून तें तेथेंच राहिलें. शांततेच्या वेळीं इतक्या मोठ्या सैन्याची जरूर नसल्यामुळें राजानें पुरेसे लोक पदरीं ठेवून बाकींच्यांनां मिठागरें बांधून दिलीं व जरूर त्या ठिकाणीं गांवठाणें बसवून तेथें वसाहत करण्यास सांगितलें. मिठागराचे उत्पन्न चांगलें व किफायतशीर असल्यामुळें मुंगीपैठणास जाण्यापेक्षा येथेच राहणे या लोकांस अधिक आवडले. राजा बिंबानंतरही त्याचे वंशज हे राज्य पुष्कळ वर्षे सुरळीतपणें चालवीत होते. (या इतिहासामध्यें बिंब हा बादशाहाच्या विनंतीवरून त्याच्या मदतीसाठीं इकडे आला हे विधान संशयास्पद आहे.)
पुढें हळूहळू मिठागरें व वसाहती वाढत जाऊन आगरी लोकांची वसती कुलाबा जिल्ह्यांतील अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहा व माणगांव तालुक्याचा थोडा भाग येथे व जंजिरा व ठाणें जिल्ह्याचा बराच भाग या ठिकाणीं पसरत गेली. जेथें खारटपणाचा भाग आहे तेथें व त्याच्य लगतच्या प्रदेशांतच फक्त आगरी लोकांची वस्ती पसरलेली आहे, मिठागराचा धंदा चागंला व किफायतशीर वाटल्यामुळें राजाबिंबाने मिठागरें बांधून दिली. बहुधा त्याने त्याच्या बरोबर असलेल्या लोकांसच मीठ बनवण्याचा हक्क दिला असावा व त्यामुळें दुसर्या लोकांचा या धंद्यांत शिरकाव झाला नसावा असें दिसतें. याप्रमाणें हा धंदा आगरी जातींत पिढयान्पिढया चालत आलेला आहे मुख्य धंदा आगराचा होऊन राहिल्यामुळें मूळचे लोक ह्या नवीन लोकांस आगरी, या नांवानें संबोधूं लागले.. आत्मोत्मोन्नतीसाठीं प्रयत्न :. हा त्यांच्या खालील पुढार्यांच्या प्रयत्नांवरून लक्षांत येईलः
१. कै. जनार्दन हिराजो दमामे जे.पी. रहाणार मुंबई,;हे ज्ञातींतील पहिले जे.पी. होत. हिंदुमुसुलमानांच्या दंग्याच्या वेळीं ह्यांनी आपल्या ज्ञातीतर्फे चांगली कामगिरी केली.
२. कै. रामजी बाळीजी म्हात्रे रा. मुंबई; ज्ञातींतील पहिले मोठे कंत्राटदार. मुंबई येथील टाक बंदर येथें यांनीं स्वखर्चांनें ज्ञातीसाठीं स्मशानभूमी व धर्मशाळा बांधलेली आहे.
३. श्रीयुत-तुकाराम धर्माजी मोकल, राहणार हाशिवरें तालुका अलिबाग जि. कुलाबा;ह्यांचे घराणें पुरातन असून ह्यांनीं मद्यापाननिषेधासाठीं व ज्ञातिबांधवांची सांपत्तिक स्थिती सुधारण्याविषयीं बरेच प्रयत्न केले व करीत आहेत.
४. कै. बाबाजी नारायण पाटील मंबई;ज्ञातींतील दुसरे कंत्राटदार, मुंबई येथील आगरी पाडयाचे संस्थापक, देऊळ बांधून त्यांत हल्लीं त्यांनीं मोफत शाळा चालू केली आहे.
५ श्रीयुत विठोबा राघो पाटील. रहाणार शहाबाज, तालुका अलिबाग, जि. कुलाबा; हे ज्ञातींतील प्रमुख व्यापारी असून चालू असलेल्या ज्ञातिहितकारक चळवळींचे चालक व आधारस्तंभ आहेत.
६. कै.हरी जोमाजी पाटील. रहाणार शहाबाजः हे आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ज्ञातिहितकारक चळवळींत पडूं लागले. ज्ञातिपरिषदेचे उत्पादक व कार्यकारी चिटणीस
७. श्रीयुत लक्ष्मण गोविंद पाटील. राहणार वाघ्रण, तालुका अलीबाग, जि. कुलाबा; हे आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ज्ञातिहितकारक चळवळींत आहेत. मुंबई येथील आगरी विद्यार्थीं-आश्रमाचे संस्थापक.
८. श्री. शाहू हरी पाटील. राहणार वाघ्रण, तालुका अलिबाग, जि.कुलाबा; आगरी अनाथ विद्यार्था-फंडाचे उत्पादक.
९ कै. लक्ष्मण तुकाराम पाटील. राहणार कर्जे, पेटा उरण, जि.कुलाबा.
१० श्रीयुत–महादेव रामजी घरत. राहणार मुंबई; आगरी परस्पर सहकारी पतपेढीचे उत्पादक व कार्यकारी अद्यक्ष.
११ श्री. लक्ष्मण गमाजी म्हात्रे, तालुका पनवेल, जि. कुलाबा; हे पुरातन घराण्यांतील असून ज्ञातीचे पुढारी आहेत.