"लीला दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. लीला दीक्षित (जन्म : गुहागर, ४ फेब्रुवारी, इ.स. १९३५ - हयात) या एक ब... |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* कोकण - विविध दिशा आणि दर्शन (२४ तज्ञांचे लेखन असलेला मासिकाच्या आकारातला पर्यटनविषयक संपादित ग्रंथ) |
* कोकण - विविध दिशा आणि दर्शन (२४ तज्ञांचे लेखन असलेला मासिकाच्या आकारातला पर्यटनविषयक संपादित ग्रंथ) |
||
* गंमत गाव (बालसाहित्य) |
* गंमत गाव (बालसाहित्य) |
||
* गाणारं झाड ( |
* गाणारं झाड (बालकविता) |
||
* चंदनवेल (संत कान्होपात्राच्या जीवनावर आधारित कादंबरी) |
* चंदनवेल (संत कान्होपात्राच्या जीवनावर आधारित कादंबरी) |
||
* नाच रे मोरया (बालसाहित्य) |
* नाच रे मोरया (बालसाहित्य) |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* मुके कित्र (बालसाहित्य) |
* मुके कित्र (बालसाहित्य) |
||
* मैत्री मोलाची (बालसाहित्य) |
* मैत्री मोलाची (बालसाहित्य) |
||
* लाखाचे बक्षीस (किशोर-कथा, १९९२) |
|||
* शतकातील बालकविता (संपादित) |
* शतकातील बालकविता (संपादित) |
||
* शुभं करोति (किशोर-कथा, १९९६) |
|||
* सागरसूर (किशोर-कथा, १९९४) |
|||
* स्वामी अपरान्ताचा (कादंबरी) |
* स्वामी अपरान्ताचा (कादंबरी) |
||
१४:१८, १३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
डॉ. लीला दीक्षित (जन्म : गुहागर, ४ फेब्रुवारी, इ.स. १९३५ - हयात) या एक बालसाहित्यकार आहेत. मुलांवर संस्कार करतानाच, त्यांचे भावविश्व जाणून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, हे लीला दीक्षित यांच्यासारख्या मोजक्याच बालसाहित्यकारांना जमले. त्यांंनी मुलांशी संवाद हाच आपला ध्यास मानला. त्यामुळेच लीला दीक्षितांची पुस्तके म्हणजे लहानांसाठी कायम जपून ठेवावा, असा ठेवा बनली.
कोकणातल्या गुहागरसारख्या निसर्गरम्य गावी त्यांचा जन्म झाल्यामुळेच. बालपणी अनुभवलेला कोकणातला निसर्ग, त्यांच्या पुस्तकांच्या केंद्रस्थानी उतरला आणि कायमचा लहानांचा होऊन गेला.
वयाच्या १८ वर्षी लग्न होऊन त्या पुण्यात आल्या. नंतर त्यांनी एम.ए., पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले. पुण्यातच एसएनडीटी महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. मराठी हा अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय असल्यामुळेच त्यांनी बालसाहित्याव्यतिरिक्तही विविध विषयांवर संशोधनपर लेखन केले आहे. दहा समाजसुधारकांची रसाळ चरित्रे त्यांनी लिहिली असून, 'प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन' या त्यांच्या पुस्तकाला राज्यसरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कारही मिळालेला आहे. असे असले, तरी मुलांचे भावविश्व हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र मानल्यामुळे बालसाहित्यकार हीच त्यांची ओळख बनली.
लीला दीक्षित यांनी लिहिलेली पुस्तके
- अंतरीचे धावे (आठवणी)
- आजोबांचं घर (बालसाहित्य)
- आनंदयोगिनी (९ स्त्री-संतांची चरित्रे)
- कोकण - विविध दिशा आणि दर्शन (२४ तज्ञांचे लेखन असलेला मासिकाच्या आकारातला पर्यटनविषयक संपादित ग्रंथ)
- गंमत गाव (बालसाहित्य)
- गाणारं झाड (बालकविता)
- चंदनवेल (संत कान्होपात्राच्या जीवनावर आधारित कादंबरी)
- नाच रे मोरया (बालसाहित्य)
- पंख नवे (बालसाहित्य)
- पोपटाचं झाड (बालसाहित्य)
- प्रतिबंब (दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचा संग्रह (संपादिका लीला दीक्षित)
- प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन (संशोधनपर ग्रंथ)
- फुलांना मिळाले रंग (बालनाट्य)
- बहाद्दर बल्लू (बालसाहित्य)
- बालशिक्षण बालसाहित्य : विविध आयाम (ग.ह.पाटील जन्मशताब्दीनिमित्त बनले्ला संपादित गौरवग्रंथ - सहसंपादिका डॉ.मंदा खांडके)
- मुके कित्र (बालसाहित्य)
- मैत्री मोलाची (बालसाहित्य)
- लाखाचे बक्षीस (किशोर-कथा, १९९२)
- शतकातील बालकविता (संपादित)
- शुभं करोति (किशोर-कथा, १९९६)
- सागरसूर (किशोर-कथा, १९९४)
- स्वामी अपरान्ताचा (कादंबरी)
सन्मान आणि पुरस्कार
- बालसाहित्यातील त्यांचे कार्य लक्षात घेऊनच परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मानाने बहाल करण्यात आले होते.
- महाराष्ट्र सरकारचा ग्रंथपुरस्कार