"तालिबान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान' या दहशतवादी संघटनेची स्थापना बैतुल्ला मसूद या कडव्या दहशतवाद्याने २००७ साली केली. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील 'फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्राइबल एरिया' अर्थात फटा क्षेत्रात १९८०च्या दशकापासून फोफावलेल्या अनेक इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना एकत्र करून त्याने या संघटनेची स्थापना केली. या संघटनेची तीन मुख्य उद्दिष्टे होती. एक म्हणजे अमेरिकेचा कट्टर विरोध करणे. दोन, पाकिस्तानमध्ये शरियतवर आधारित असेलेले कट्टर इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तीन, अफगाणिस्तान, चीन व भारतातील जिहादी संघर्षाला समर्थन, सहकार्य करणे.
{{विस्तार}}

विशेष म्हणजे ही संघटना पाकिस्तानी लष्कराला पहिल्यापासूनच इस्लामचा शत्रू मानत आली आहे. पाकिस्तान जरी इस्लामिक राष्ट्र असले, तरी कट्टर इस्लामी राज्याची फार कमी वैशिष्ट्ये पाकिस्तानात आहेत. असे कडवे इस्लामिक राज्य पाकिस्तानात आणण्यात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानचे लष्कर असल्याचे या संघटनेचे मत आहे. पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व लष्कराच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे या संघटनेने आपल्या स्थापनेनंतर लगेचच पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व आणि लष्कराला लक्ष्य करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने या संघटनेविरुद्ध लष्करी कारवाई केली व त्यासाठी अमेरिकेची मदत घेतली.

२००९ साली पाकिस्तान तालिबान व लष्कर यांच्यात पहिला संघर्ष झाला. त्यात मसूद मारला गेला. १५ जून २०१४ रोजी या संघटनेविरुद्ध पाकिस्तानने दुसरी लष्करी कारवाई सुरू केली.

या दुसर्‍या लष्करी मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कारवाई केवळ 'तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान'च्या विरोधात आहे. ती पाकिस्तानमधील इतर दहशतवादी विशेषतः पाकिस्तानच्या पूर्वेकडे सक्रिय असणाऱ्या 'जमात-उल-दवा', 'लष्कर-ए-तैय्यबा' यांसारख्या संघटनांच्या विरुद्ध नाही. या संघटनांना सूट देण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जर या संघटना पश्चिमेकडील पाकिस्तान तालिबानला जाऊन मिळाल्या, तर पाकिस्तानसाठी तो सर्वात मोठा धोका असेल. त्यामुळे या संघटनांविषयी मवाळ धोरण स्वीकारण्यात आले, तसेच या संघटनांचा फायदा भारतविरोधी देखील करता येत असल्यामुळे त्यांच्याविषयी सहकार्याचे धोरण पाकिस्तानी लष्कराचे राहिले आहे. हाफिज सईदचा पाकिस्तानातील मुक्त संचार किंवा नुकतेच मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार लखवीला मिळालेला जामीन या गोष्टी 'जमात-उल-दवा' व 'लष्कर-ए-तैय्यबा'विषयीचा 'सॉफ्ट कॉर्नर' स्पष्ट करतात. एवढेच नाही तर पाकिस्तान तालिबानला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर हाफिज सईदची मदतही घेऊ शकते.

==तालिबानची दहशतवादी कृत्ये==
* पेशावरमधील शाळेवर केलेला अमानुष दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात .... मुले मृत्युमुखी पडली.

[[वर्ग:दहशतवाद]]
[[वर्ग:इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना]]
[[वर्ग:इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना]]
[[वर्ग:अफगाणिस्तानातील यादवी]]
[[वर्ग:अफगाणिस्तानातील यादवी]]
ओळ ८: ओळ १८:
[[वर्ग:अफगाणिस्तानमधील राजकारण]]
[[वर्ग:अफगाणिस्तानमधील राजकारण]]
[[वर्ग:दहशतवादी संघटना]]
[[वर्ग:दहशतवादी संघटना]]

[[ml:താലിബാന്‍]]

२१:०१, ९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

'तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान' या दहशतवादी संघटनेची स्थापना बैतुल्ला मसूद या कडव्या दहशतवाद्याने २००७ साली केली. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील 'फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्राइबल एरिया' अर्थात फटा क्षेत्रात १९८०च्या दशकापासून फोफावलेल्या अनेक इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना एकत्र करून त्याने या संघटनेची स्थापना केली. या संघटनेची तीन मुख्य उद्दिष्टे होती. एक म्हणजे अमेरिकेचा कट्टर विरोध करणे. दोन, पाकिस्तानमध्ये शरियतवर आधारित असेलेले कट्टर इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तीन, अफगाणिस्तान, चीन व भारतातील जिहादी संघर्षाला समर्थन, सहकार्य करणे.

विशेष म्हणजे ही संघटना पाकिस्तानी लष्कराला पहिल्यापासूनच इस्लामचा शत्रू मानत आली आहे. पाकिस्तान जरी इस्लामिक राष्ट्र असले, तरी कट्टर इस्लामी राज्याची फार कमी वैशिष्ट्ये पाकिस्तानात आहेत. असे कडवे इस्लामिक राज्य पाकिस्तानात आणण्यात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानचे लष्कर असल्याचे या संघटनेचे मत आहे. पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व लष्कराच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे या संघटनेने आपल्या स्थापनेनंतर लगेचच पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व आणि लष्कराला लक्ष्य करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने या संघटनेविरुद्ध लष्करी कारवाई केली व त्यासाठी अमेरिकेची मदत घेतली.

२००९ साली पाकिस्तान तालिबान व लष्कर यांच्यात पहिला संघर्ष झाला. त्यात मसूद मारला गेला. १५ जून २०१४ रोजी या संघटनेविरुद्ध पाकिस्तानने दुसरी लष्करी कारवाई सुरू केली.

या दुसर्‍या लष्करी मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कारवाई केवळ 'तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान'च्या विरोधात आहे. ती पाकिस्तानमधील इतर दहशतवादी विशेषतः पाकिस्तानच्या पूर्वेकडे सक्रिय असणाऱ्या 'जमात-उल-दवा', 'लष्कर-ए-तैय्यबा' यांसारख्या संघटनांच्या विरुद्ध नाही. या संघटनांना सूट देण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जर या संघटना पश्चिमेकडील पाकिस्तान तालिबानला जाऊन मिळाल्या, तर पाकिस्तानसाठी तो सर्वात मोठा धोका असेल. त्यामुळे या संघटनांविषयी मवाळ धोरण स्वीकारण्यात आले, तसेच या संघटनांचा फायदा भारतविरोधी देखील करता येत असल्यामुळे त्यांच्याविषयी सहकार्याचे धोरण पाकिस्तानी लष्कराचे राहिले आहे. हाफिज सईदचा पाकिस्तानातील मुक्त संचार किंवा नुकतेच मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार लखवीला मिळालेला जामीन या गोष्टी 'जमात-उल-दवा' व 'लष्कर-ए-तैय्यबा'विषयीचा 'सॉफ्ट कॉर्नर' स्पष्ट करतात. एवढेच नाही तर पाकिस्तान तालिबानला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर हाफिज सईदची मदतही घेऊ शकते.

तालिबानची दहशतवादी कृत्ये

  • पेशावरमधील शाळेवर केलेला अमानुष दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात .... मुले मृत्युमुखी पडली.