"श्याम पोंक्षे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: श्याम पोंक्षे (जन्म: चिपळूण, २१ जुलै. १९५३; मृत्यू : पुणे, १ डिसेंब... |
(काही फरक नाही)
|
००:४५, ८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
श्याम पोंक्षे (जन्म: चिपळूण, २१ जुलै. १९५३; मृत्यू : पुणे, १ डिसेंबर, २०१४) हे एक मराठी मराठी नाट्यअभिनेते होते. विनोदाची उत्तम जाण असलेले आणि वाचनाची अफाट आवड असलेला कलावंत म्हणूने ते रंगकर्मींमध्ये प्रसिद्ध होते.
चिपळुणात जन्मलेल्या पोंक्षे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. आर्यन शाळेत शिक्षण झाले. महाराष्ट्र बँकेत नोकरी करताना त्यांनी नाटकाची आवड जोपासली. सुरुवातीला त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्यांत त्यांनी कामे केली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा प्रवेश १९७८मध्ये साहित्य संघाची निर्मिती असलेल्या 'पंडित आता तरी पुरे' या नाटकातून झाला.
रंगभूमीवरील सहज वावर आणि बोलका चेहरा हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांना स्वस्थ बसलेले पाहिलेच नाही, असे सहकलाकार सांगतात. काहीवेळा 'छंद' या विभागात 'वाचन' असे लिहिण्याची पद्धत असते. पोंक्षे यांचे वाचन अशा कप्प्यातले नव्हते. ते एखाद्या विषयावर बोलताना त्यासंबंधीच्या पुस्तकांतील संदर्भ लगेच देत. अवांतर वाचनासोबत नाटक या विषयाचेही त्यांचे उत्तम वाचन होते. ३५ वर्षे ते नाट्यक्षेत्रात होते. विविध नाटकांचे शेकडो प्रयोग त्यांच्या नावावर आहेत. ते मुख्य भूमिकेत फारसे झळकले नाहीत; पण त्यानंतरच्या भूमिकांचे त्यांनी नक्कीच सोने केले. हिरोनंतर लक्षात राहाणारी भूमिका त्यांचीच असायची.
श्याम पोंक्षे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- असा मी असा मी
- आता नको नंतर (नायक)
- आम्ही दोघं राजाराणी
- एका लग्नाची गोष्ट (दामले यांचे वडील)
- कालचक्र (विशा)
- घरात हसरे तारे (संजय)
- चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी (प्रभुणे)
- चि.सौ.कां चंपा गोवेकर (भटजी, गोरे वकील)
- जन्मगाठ (दोन भूमिका)
- जादू तेरी नजर
- टिळक आणि आगरकर (आगरकर)
- तांदुळ निवडता निवडता (पी.ए.)
- पंडित आता तरी पुरे
- पोलीसनामा (वेडा)
- प्रियतमा
- बे दुणे पाच
- मला भेट हवी (नायक)
- लेकुरे उदंड झाली (व्यंकटराव)
- लोककथा ७८
- शू कुठे बोलायचं नाही
- सवाल अंधाराचा (पी.ए., डी.के.)
- हसत हसत फसवुनी (डॉ. सतीश)