"थोरले शाहू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: थोरले शाहू (जन्म : १८ मे १६८२; मृत्यू सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत... |
(काही फरक नाही)
|
११:१६, ७ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
थोरले शाहू (जन्म : १८ मे १६८२; मृत्यू सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजीचे पुत्र संभाजी यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही शौर्यगुण येऊ नयेत अशी काळजी बादशहाने घेतली होती. शिवाजीपुत्र राजाराम यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई हिने राज्यकारभार करायला सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूला सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शूच्या सैनिकांनी केलेल्या युद्धानंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना सातार्याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. सातार्याला या थोरल्या शाहूंनी मरेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबर इ.स.१७४९ पर्यंत राज्य चालविले.
सातार्याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांना या गादीकडूनच कारभाराची वस्त्रे घ्यावी लागत. थोरले शाहू युद्ध करीत नसले तरी त्यांच्या काळात मराठ्यांनी बाळाजी विश्वनाथ ते राघोबादादा आणि चिमाजी अप्पा यांनी उत्तर हिंदुस्थानचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखविला.
या शाहू महाराजांचे ’छत्रपती थोरले शाहू महाराज’ या नावाचे चरित्र आसाराम सैंदाणे यांनी लिहिले आहे. प्रीतम प्रकाशनने छापवून घेतलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन निनाद बेडेकर यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१५मध्ये झाले.