"पद्माकर कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
गल्लत : सूचना :- ठाण्याचे चित्रकार आणि छायचित्रकार पद्माकर कुलकर्णी आणि भीमसेन जोशींच्या पत्नी वत्सलाबाई जोशी यांना लग्नापूर्वी, औरंगाबादला संगीत शिकविणारे पद्माकर कुलकर्णी हे वेगळे आहेत. |
गल्लत : सूचना :- ठाण्याचे चित्रकार आणि छायचित्रकार पद्माकर कुलकर्णी आणि भीमसेन जोशींच्या पत्नी वत्सलाबाई जोशी यांना लग्नापूर्वी, औरंगाबादला संगीत शिकविणारे पद्माकर कुलकर्णी हे वेगळे आहेत. |
||
---------------------------------- |
|||
पद्माकर शंकर कुलकर्णी (जन्म : १९३३; मृत्यू : चिंचवड, ६ जानेवारी, २०१५) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. |
पद्माकर शंकर कुलकर्णी (जन्म : १९३३; मृत्यू : चिंचवड, ६ जानेवारी, २०१५) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. |
||
ओळ १५: | ओळ १६: | ||
==कट्यार काळजात घुसली== |
==कट्यार काळजात घुसली== |
||
डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी ’कट्यार काळजात घुसली’ ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. |
डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी ’कट्यार काळजात घुसली’ ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र गांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर प्रयोग केले. |
||
==पुरस्कार== |
|||
* वसंतराव मेमोरियल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पद्माकर कुलकर्णी यांना, त्यांनी संगीतक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे व पं. तळवलकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले (ऑगस्ट २०१२). |
|||
००:२३, १० जानेवारी २०१५ ची आवृत्ती
गल्लत : सूचना :- ठाण्याचे चित्रकार आणि छायचित्रकार पद्माकर कुलकर्णी आणि भीमसेन जोशींच्या पत्नी वत्सलाबाई जोशी यांना लग्नापूर्वी, औरंगाबादला संगीत शिकविणारे पद्माकर कुलकर्णी हे वेगळे आहेत.
पद्माकर शंकर कुलकर्णी (जन्म : १९३३; मृत्यू : चिंचवड, ६ जानेवारी, २०१५) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पद्माकर कुलकर्णी यांनी त्र्यंबकराव जानोरीकर, वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जात.
वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान
आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या द्वारे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम केले व अनेक शिष्य व चांगले कलाकार घडविले. फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी चिंचवडमध्ये वार्षिक संगीत महोत्सव सुरू केला. या महो्त्सवात पिंपरी-चिंचवडकरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
संगीतविषयक अन्य कार्य
पंडित पद्माकर कुलकर्णी हे काही काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीचे मानद संचालक होते. शहरात ते पिंपरी-चिंचवड महोत्सवासह स्वरसागर संगीत महोत्सवही भरवत. शहरातील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.
सवाई गंधर्व महोत्सव
पुण्यात भरणार्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी किमान दोन वेळा आपले गायन सादर केले होते. देशातील बहुतेक सर्व मानाच्या संगीत महोत्सवामध्येही त्यांनी कला सादर केली होती.
कट्यार काळजात घुसली
डॉ. वसंतराव देशपांडे वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी ’कट्यार काळजात घुसली’ ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र गांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर प्रयोग केले.
पुरस्कार
- वसंतराव मेमोरियल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पद्माकर कुलकर्णी यांना, त्यांनी संगीतक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे व पं. तळवलकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले (ऑगस्ट २०१२).
(अपूर्ण)