"पाटेश्वर लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असल... खूणपताका: वार्तांकनशैली ? |
(काही फरक नाही)
|
२३:२८, ३० डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामणोली डोंगररांगेतल्या एक डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची ३०२५ फूट आहे.
लेण्यांचे वैशिष्ट्य
पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी". येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आढळते.
इतिहास
पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात असले तरी पाटेश्वरचे मंदिर अठराव्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे.