"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १७७: | ओळ १७७: | ||
* '''टायमन ऑफ अॅथेन्स :''' |
* '''टायमन ऑफ अॅथेन्स :''' |
||
** १. टायमन ऑफ अॅथेन्स (इ.स. १८९६) चिं.अ.लिमये |
** १. टायमन ऑफ अॅथेन्स (इ.स. १८९६) चिं.अ.लिमये |
||
** २. विश्वमित्र (सन?) रा.सा.कानिटकर |
** २. विश्वमित्र (सन?) रा.सा. कानिटकर |
||
* '''टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :''' |
* '''टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :''' |
||
ओळ २६४: | ओळ २६४: | ||
* '''हॅम्लेट :''' |
* '''हॅम्लेट :''' |
||
** १. विकारविलसित (इ.स. १८८३) [[गोपाळ गणेश आगरकर]] (प्रमुख भूमिका - [[गणपतराव जोशी]]) |
** १. विकारविलसित (इ.स. १८८३) [[गोपाळ गणेश आगरकर]] (प्रमुख भूमिका - [[गणपतराव जोशी]]) |
||
** २. वीरसेन (इ.स. १८८३) गोविंद |
** २. वीरसेन (इ.स. १८८३) [[गोविंद वासुदेव कानिटकर]] |
||
** ३. हिंमत बहाद्दूर (इ.स. १८८३) आनंद स. बर्वे |
** ३. हिंमत बहाद्दूर (इ.स. १८८३) आनंद स. बर्वे |
||
** ४. हॅम्लेट (इ.स. १९५६) नाना जोग (प्रमुख भूमिका - [[दामू केंकरे]]) |
** ४. हॅम्लेट (इ.स. १९५६) नाना जोग (प्रमुख भूमिका - [[दामू केंकरे]]) |
||
ओळ २७५: | ओळ २७५: | ||
* '''ऑथेल्लो+किंग लियर+मॅकबेथ+हॅम्लेट :''' |
* '''ऑथेल्लो+किंग लियर+मॅकबेथ+हॅम्लेट :''' |
||
** १. गगनभेदी (सन?) [[विष्णु वामन शिरवाडकर]] |
** १. गगनभेदी (सन?) [[विष्णु वामन शिरवाडकर]] |
||
* याशिवाय [[गोविंद वासुदेव कानिटकर]] यांनी शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’व्यतिरिक्त ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचेही मराठी अनुवाद केले आहेत. |
|||
==हेही पहा== |
==हेही पहा== |
१२:३७, २२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
विल्यम शेक्सपियर (इंग्लिश: William Shakespeare) (२६ एप्रिल, इ.स.१५६४ (बाप्तिस्मा. जन्मदिनांक अज्ञात) - २३ एप्रिल, इ.स. १६१६) हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत.
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
जीवन
विल्यम शेक्सपियर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात लॅटिन भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, फ्रेंच आणि इटालियन भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून लंडन गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
त्यानंतर विल्यमने स्वतःच नाटके लिहून ती सादर करायला सुरुवात केली आणि लोकांना ती आवडायलाही लागली. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली. या काळात विल्यम शेक्सपियर यांनी ३६ नाटके आणि १५४ सुनीते लिहिली.
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपियर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपियर स्वतःची नाटके या नाट्यगृहात करू लागले. आता मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले.
इ.स. १६१० साली शेक्सपियर पुन्हा आपल्या स्ट्रॅटफोर्ड गावात येऊन राहू लागले, ते कामापुरतेच लंडनला जात येत असत. इ.स. १६१६ साली स्ट्रॅटफोर्ड या गावातच विल्यम शेक्सपियर यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.
शेक्सपियरचे वाङ्मय
यांत काव्य आणि नाटके येतात. मराठीमध्ये, परशुराम देशपांडे यांनी ’राजहंस एव्हनचा-शेक्सपिअर’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तकांच्या संचात शेक्सपियरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.
काव्ये
शेक्सपियरने अनेक (१२+२==चौदा ओळी कविता) सुनीते (sonnets) लिहिली आणि त्यांशिवाय अनेक दीर्घकाव्ये. त्यांतील काही दीर्घकाव्ये ही अशी :-
- अ लहर्स कंप्लेन्ट
- द पॅशनेट पिल्ग्रिम
- द रेप ऑफ ल्यूक्रेसी
- व्हीनस अॅन्ड अॅडॉनिस
नाटके
शेक्सपियर यांनी ३६ नाटके स्वतंत्रपणे आणि पेरिक्लिस नावाचे एक नाटक संयुक्तपणे लिहिले. त्यांच्या नाटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :
- निव्वळ कल्पनारम्य नाटके
- अ मिडसमर नाइट्स ड्रीम
- अॅज यू लाइक इट
- ट्वेल्फ्थ नाइट
- द टू जेन्टलमेन ऑफ व्हेरोना
- लव्ह्ज लेबर्स लॉस्ट
- गंभीर नाटके
- ऑलिज् वेल दॅट एन्ड्ज वेल
- मच अ डू अबाउट नथिंग
- मेझर फॉर मेझर
- वस्तुस्थितीवर आधारलेली नाटके किंवा प्रहसने
- द टेमिंग ऑफ श्र्यू
- द मेरी वाइव्ह्ज ऑफ विंडसर
- शोकांतिका
- ऑथेल्लो
- किंग लियर
- मॅक्बेथ
- रोमियो अॅन्ड ज्यूलिएट
- हॅम्लेट
- प्रणयरम्य नाटके
- द टेंप्टेस्ट
- द विंटर्स टेल
- सिंबेलाईन
- ऐतिहासिक
- दुसरा रिचर्ड
- तिसरा रिचर्ड
- चौथा हेन्री
- पाचवा हेन्री
- आठवा हेन्री
- रोमन ऐतिहासिक नाटके :
- अॅन्टनी अॅन्ड क्लिओपॅट्रा
- कोरिओलेनस
- ज्यूलियस सीझर
शेक्सपियरच्या नाटकांवर बेतलेल्या आणि जागतिक साहित्यात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या (१ल्या) दहा कादंबर्या आणि त्यांचे लेखक
- अ थाऊजंड एकर (जेन स्मायली)
- केक्स अॅन्ड अले (सॉमरसेट मॉम)
- द टॅलेंटेड मिस्टर रिप्ले (पॅट्रेशिया हायस्मिथ)
- द डॉग्ज ऑफ वॉर (फ्रेडरिक फोर्सिथ)
- द डॉटर ऑफ टाइम (जोसेफाइन टे)
- द ब्लॅक प्रिन्स (आयरिश मर्डोक)
- ब्रेव न्यू वर्ल्ड (आल्डस हक्सले)
- मोबी डिक (हर्मन मेल्व्हिल)
- लव्ह इन वाइल्डनेस (अमांडा क्रेग)
- वाईज चिल्ड्रन (अँजेला कार्टर)
शेक्सपियरच्या नाटकांवरून बनलेले चित्रपट
- लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा ’हॅम्लेट’ (१९४८)
शेक्सपियरच्या नाटकांची मराठी रूपांतरे आणि त्यांचे लेखक
- अॅज यू लाइक इट :
- १. अगदी मनासारखं (इ.स. १९५७) द.के.भट
- २. संगीत प्रेमगुंफा (इ.स. १९०८) दामोदर नेवाळकर
- ३. (नांव?)(सन?) अजय आरोसकर
- अॅन्टनी अॅन्ड क्लिओपात्रा :
- १. वीरमणी आणि शृंगारसुंदरी (इ.स. १९८२) वासुदेव बा.केळकर
- २. प्रतापराव आणि मंजुळा (इ.स. १८८२) ए.वि.मुसळे
- ३. संगीत शालिनी(?) (इ.स. १९०१) के.वि.करमरकर
- ४. संगीत ताराविलास(?) (इ.स. १९०४) द.अ.केसकर
- ५. मोहनतारा(?) (इ.स. १९०८) के.रा.छापखाने
- ऑथेल्लो:
- १. ऑथेल्लो (इ.स. १८६७) महादेवशास्त्री कोल्हटकर
- २. झुंझारराव (इ.स. १८९०) गोविंद बल्लाळ देवल
- ३. ऑथेल्लो (इ.स. १९४७) इंदुमती जगताप
- ४. ऑथेल्लो (सन?)अजय आरोसकर
- ५. ऑथेल्लो (इ.स. १९६५) विष्णु वामन शिरवाडकर
- ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल :
- १. वल्लभानुनय (इ.स. १८८७) विष्णु मोरेश्वर महाजनी
- २. संगीत प्रियराधन (इ.स. १९१३) वा.स.पटवर्धन
- ए कॉमेडी ऑफ एरर्स
- १. भुरळ अथवा ईश्वरीकृत लपंडाव (इ.स. १८७६) आ.वि.पाटकर
- २. भ्रांतिकृत चमत्कार (इ.स. १८७८) ब.रा.प्रधान आणि श्री.भि.जठार
- ३. गड्या अपुला गाव बरा (इ.स. १९५९) शामराव नीळकंठ ओक
- ४. अंगूर (इ.स. १९८२) गुलझार-दिग्दर्शित हिंदी चित्रपट
- किंग जॉन :
- १. कपिध्वज (इ.स. १९०४) ल.ना. जोशी
- किंग लियर :
- १. अतिपीडचरित (इ.स. १८८१) शंकर मो.रानडे
- २. कन्यापरीक्षण (इ.स. १८८१) गो.स.मोरे
- ३. विकारविहार (इ.स. १८८१) ल.ना. जोशी
- ४. सम्राट सिंह (इ.स. १९७३) प्र.के.अत्रे
- ५. राजा लिअर (इ.स. १९७४) विंदा करंदीकर
- ६. नटसम्राट (इ.स. १९०७) विष्णु वामन शिरवाडकर
- ७. किंग लियर (सन?) द.म.खेर
- किंग हेन्री दी एड्थ :
- १. राजा रघुनाथराव (इ.स. १९०४) हणमंत बा.अत्रे
- किंग हेन्री द फिफ्थ :
- १. पंचम हेनरी चरित (इ.स. १९११) खंडेराव भिकाजी बेलसरे
- किंग हेन्री द फोर्थ :
- १. बंडाचे प्रायश्चित्त (इ.स. १९१५) नारायण ग. लिमये
- ज्युलियस सीझर :
- १. विजयसिंह (इ.स. १८७२) काशीनाथ गो. नातू
- २. ज्युलियस सीझर (इ.स. १८८३) रामकृष्ण ता.पावसकर
- ३.ज्युलियस सीझर (इ.स. १९१३) खंडेराव भिकाजी बेलसरे
- ४. ज्युलियस सीझर (इ.स. १९५९) मा.ना.कुलकर्णी
- ५. ज्युलियस सीझर (इ.स. १९७४) अ.अं.कुलकर्णी
- ६. ज्युलियस सीझर (सन?) भा.द.खेर
- टायमन ऑफ अॅथेन्स :
- १. टायमन ऑफ अॅथेन्स (इ.स. १८९६) चिं.अ.लिमये
- २. विश्वमित्र (सन?) रा.सा. कानिटकर
- टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :
- १. स्त्रियांचे नेत्रकटाक्ष (इ.स. १८८५) द.वि.मराठे
- २. कालिंदी कांतिपूरचे दोन गृहस्थ (इ.स. १८९८) द.अ.आपटे
- टेंपेस्ट :
- १. टेंपेस्ट (इ.स. १८७५) रावबहादुर नीलकंठ जनार्दन कीर्तने
- २. तुफान (इ.स. १९०४) खंडेराव भिकाजी बेलसरे
- ३. तुफान (?) रामराव बाळकृष्ण कीर्तिकर
- ४. मुक्त मरुता (सन?) भा.वि.वरेरकर, शशिकला वझे
- टेमिंग ऑफ द श्ऱ्यू :
- १. ? (इ.स. १९०१) स.प. पंडित
- २. संगीत त्राटिका (इ.स. १९२४) वासुदेव बा. केळकर
- ३. कर्कशादमन (इ.स. १९५७) ज.त्रि.जोगळेकर
- ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड :
- १. जयाजीराव (इ.स. १८९१) भा.रा.नानल
- २. दैवदुर्विलास (इ.स. १९०४) वासुदेव पु.साठे
- ३. राजा राक्षस (सन?) कृ.ह.दीक्षित
- ट्वेल्फ्थ नाइट :
- १. वेषविभ्रम नाटक (इ.स. १८९१) कृ.प.गाडगीळ
- २. भ्रमविलास (इ.स. १९१३) बळवंत ह.पंडित
- ३. प्रेमविनोद (इ.स. १९१९) अनंत वि.आपटे आणि ता.ने.पांगळ
- ४. वाग्विलास (इ.स. १९२८) विष्णु ग.जोशी
- ५. ट्वेल्थ नाइट (सन?) शशिकला बेहेरे
- ६. संगीत मदनाची मंजिरी (इ.स. १९६५) विद्याधर गोखले
- ७. पिया बेहेरूपिया-भारतीय लोककलेच्या अंगाने केलेले स्वैर हिंदी रूपांतर (इ.स. २०१२) : अमितोष नागपाल
- द विंटर्स टेल :
- १. संगीत मोहविलसित (इ.स. १९८१-८२) विष्णु मोरेश्वर महाजनी
- २. संगीत संशयसंभ्रम (इ.स. १८९५) गजानन चिं. देव
- ३. संगीत विकल्पविमोचन (इ.स. १९०८) दामोदर वि. नेवाळकर
- पेरिक्लीज :
- १. सुधन्वा (इ.स. १८८३) कृ.वा.फडके
- २. प्रतापमुकुट (सन?) ब.रा.पाटील
- मॅकबेथ :
- १. डाकिनी विलास (इ.स. १९१९) ल.ना. जोशी
- २. मानाजीराव (इ.स. १९१८) शिवराम महादेव परांजपे
- ३. राजमुकुट (इ.स. १९५४) वि.वा.शिरवाडकर
- ४. मॅकबेथ (सन?) अजय आरोसकर
- मच अ डू अबाउट नथिंग :
- १. रजाचा गज (इ.स. १९०६) पांडुरंग गं. लिमये
- २. विरोधाभास (सन?) पां.वा.सहस्रबुद्धे आणि भा.द.खेर
- मर्चंट ऑफ व्हेनिस :
- १.मोहनाची अंगठी (इ.स. १८९९) द.गो. लिमये
- २. संगीत प्रणयमुद्रा (इ.स. १९०५) विठ्ठल सीताराम गुर्जर
- ३. व्हेनिस नगरचा व्यापारी (इ.स. १९१०) खंडेराव भिकाजी बेलसरे
- ४. व्हेनिस नगरचा व्यापारी (सन?) दा.न. शिखरे
- ५. संगीत सौदागर (सन?) मोहन आगाशे
- ६. स्त्री न्यायचातुर्य (सन?) आत्माराम वि.पाटकर
- मिडसमर नाइटड्रीम :
- १. मधुयामिनी स्वप्न (इ.स. १८८८) कृष्णाजी ना. आठल्ये
- २. थोडक्यात चुकलं (इ.स. १८८९) ग.गो.तळवलकर
- ३. संगीत प्रेममकरंद (इ.स. १९०४) अनंत ना. उकिडवे
- ४. मधुयामिनी स्वप्नदर्शन (इ.स. १९१३) खंडेराव भिकाजी बेलसरे
- ५. ऐन वसंतात अर्ध्या रात्री (सन?)राजीव नाईक
- मेझर फॉर मेझर :
- १. संगीत सुमती (इ.स. १९०४) श.वि.कुलकर्णी
- २. समान शासन (इ.स. १९१०) दामोदर वि.नेवाळकर
- ३. सुमतिविजय (इ.स. १९११) ह.ना.आपटे
- ४. संगीत झोटिंगशाही (?) वीर वामनराव जोशी
- मेरी वाइव्ह्ज ऑफ विंडसर :
- १. चतुरगडच्या विनोदी स्त्रिया (इ.स. १९०५) पांडुरंग गं.लिमये
- रोमियो अॅन्ड ज्युलियेट:
- १. संगीत ताराविलास (इ.स. १९०४) दत्तात्रय केसकर
- २. प्रतापराव आणि मंजुळा (सन?) एकनाथ मुसळे
- ३. प्रेमाचा कळस/रोमिओ ज्युलिएट (इ.स. १९०८) खंडेराव भिकाजी बेलसरे
- ४. शशिकला आणि रत्नपाल (सन?) नारायण कानिटकर
- ५. संगीत शालिनी (इ.स. १९०१) तुकाराम जावजी (?)
- सिंबेलाईन :
- १. तारा नाटक (इ.स.१८८८) विष्णु मोरेश्वर महाजनी
- २.? (?) ल.ग.देव
- हॅम्लेट :
- १. विकारविलसित (इ.स. १८८३) गोपाळ गणेश आगरकर (प्रमुख भूमिका - गणपतराव जोशी)
- २. वीरसेन (इ.स. १८८३) गोविंद वासुदेव कानिटकर
- ३. हिंमत बहाद्दूर (इ.स. १८८३) आनंद स. बर्वे
- ४. हॅम्लेट (इ.स. १९५६) नाना जोग (प्रमुख भूमिका - दामू केंकरे)
- ५. हॅम्लेट (इ.स. १९६२) भा.द.खेर
- ६. हॅम्लेट (इ.स. २०१३) परशुराम देशपांडे (प्रमुख भूमिका - मंदार कुलकर्णी)
- ७. हॅम्लेट (?) नानासाहेब फाटक (प्रमुख भूमिका - नानासाहेब फाटक)
- ८. संक्षिप्त हॅम्लेट (इ.स. २०१३) (निर्माते ’नाट्यद्वयी’चे सई परांजपे आणि अरुण जोगळेकर)
- ९. ’जागर’ प्रस्तुत दोन अंकी हॅम्लेट (११ मार्च, इ.स. २०१३) परशुराम देशपांडे
- ऑथेल्लो+किंग लियर+मॅकबेथ+हॅम्लेट :
- १. गगनभेदी (सन?) विष्णु वामन शिरवाडकर
- याशिवाय गोविंद वासुदेव कानिटकर यांनी शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’व्यतिरिक्त ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचेही मराठी अनुवाद केले आहेत.
हेही पहा
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- शेक्सपियरचे साहित्य इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA