"बंडा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: बंडा जोशी, प्रचलित लिखाण - बण्डा जोशी, हे मराठीताले एक हास्यकलावं... |
(काही फरक नाही)
|
२३:३०, ४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
बंडा जोशी, प्रचलित लिखाण - बण्डा जोशी, हे मराठीताले एक हास्यकलावंत आहेत. त्यांचे पूर्ण नाव बण्डा ऊर्फ भालचंद्र दत्तात्रय जोशी. मूळ गाव कोल्हापूर. त्यांच्या आधी जन्मलेली त्यांची बहीण अर्भकावस्थेतच गेली. त्यामुळे पुढचे मूल जगावे म्हणून त्याला त्यांच्या दीर्घायुषी आजोबांचे बण्डा हे नाव ठेवण्यात आले.
घरात आजोबांच्या नावाने मुलाला कशी हाक मारणार म्हणून बण्डा ऊर्फ भालचंद्र असे नाव बनवून त्याच नावाने बंडा जोशी यांना शाळेत घालण्यात आले. शाळेत ते भालचंद्र जोशी याच नावाने वावरले.
नोकरी
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर प्रादेशिक बातम्या देणारे एक भालचंद्र जोशी होते, म्हणून जेव्हा बंडा जोशी यांना त्याच केंद्रावर नोकरी लागली तेव्हा त्यांना आपल्या नावातले ’भालचंद्र’ गाळावे लागले. बंडा जोशी पुणे केंद्रावरून सुप्रभात नावाचा कार्यक्रम करीत. तो खूप लोकप्रिय ठरला होता.
बंडा जोशी हे जेव्हा एकपात्रीचा प्रयोग करतात तेव्हा त्यात त्यांच्या कविताही ते म्हणून दाखवतात. ’हास्यपंचमी’ आणि हास्यखळखळाट’ ही त्यांच्या एकपात्री प्रयोगांची नावे आहेत.
बंडा जोशी हे ’आम्ही एकपात्री’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत.
==बंडा जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- खळखळाट (हास्यकविता संग्रह)
बण्डा जोशी यांना मिळालेले पुरस्कार
- माधव मनोहर पुरस्कार (२००९)
- सुखकर्ता पुरस्कार (२०१४)