Jump to content

"कृष्णा कल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका आहेत. मूळच्या कारवार...
(काही फरक नाही)

१३:११, २९ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका आहेत.

मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषिक प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला आणि गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा‍र्‍या यात्राजत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.