"अनंत अंतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==बालपण== |
==बालपण== |
||
रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये जन्मलेले अनंत अंतरकर यांना साहित्याचा वारसा आपल्या वडिलांकडूच मिळाला होता. शिक्षकी पेशातले त्यांचे वडील, बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे संस्कृतचे पंडित होते. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होतं. 'सरूप शाकुंतल' आणि ' |
[[रत्नागिरी]] जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये जन्मलेले अनंत अंतरकर यांना साहित्याचा वारसा आपल्या वडिलांकडूच मिळाला होता. शिक्षकी पेशातले त्यांचे वडील, बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे संस्कृतचे पंडित होते. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होतं. 'सरूप [[शाकुंतल]]' आणि '[[मेघदूत]]च्छाया' हे त्यांचे अनुवादग्रंथ त्यावेळी महाराष्ट्रात खूपच गाजले होते. तोच साहित्यिक वारसा अनंतरावांकडे आला. आपल्या वडिलांच्या सहवासात अभिजात ग्रंथांच्या वाचनाने त्यांचा पिंड घडत गेला, साहित्यविषयक दृष्टी विकसित होऊ लागली. वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे अनंतराव मुंबईत आले. |
||
==नोकर्या== |
|||
१९३५ ते १९४२ या काळात अंतरकर लेखन, वाचन आणि संपादन याच्याशी संबंधित अशा नऊ नोकर्या करत होते. त्यामध्ये प्रभात, मौज, सत्यकथा, आहार, वसंत या नियतकालिकांचा समावेश होता. त्याच काळात ते आकाशवाणीसाठीही लेखन करत होते आणि 'भाषणेही सादर करत होते. याच काळात त्यांची 'चोरटे हल्ले' आणि 'गाळीव रत्ने' ही अभिजात विनोदाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली होती. |
|||
१९३८ सालामध्ये अनंतरावांवर सत्यकथा मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी ते केवळ २७ वर्षांचे होते. सत्यकथेचे कार्यकारी संपादक म्हणून काम करताना त्यांनी अनेक नवीन लेखकांना संधी दिली. त्यांतले [[अरविंद गोखले]], [[दि.बा. मोकाशी]], [[जी.ए. कुलकर्णी]] हे लेखक पुढे मराठी साहित्याच्या क्षेत्रात नामवंत झाले. |
|||
२३:४१, २७ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
हे पान अनाथ आहे. | |
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
अनंत बाळकृष्ण अंतरकर (जन्म : डिसेंबर १, १९११ - मृत्यू : ऑक्टोबर ३, १९६६) हे एक मराठी संपादक होते. ते हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक होते.
बालपण
रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये जन्मलेले अनंत अंतरकर यांना साहित्याचा वारसा आपल्या वडिलांकडूच मिळाला होता. शिक्षकी पेशातले त्यांचे वडील, बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर हे संस्कृतचे पंडित होते. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होतं. 'सरूप शाकुंतल' आणि 'मेघदूतच्छाया' हे त्यांचे अनुवादग्रंथ त्यावेळी महाराष्ट्रात खूपच गाजले होते. तोच साहित्यिक वारसा अनंतरावांकडे आला. आपल्या वडिलांच्या सहवासात अभिजात ग्रंथांच्या वाचनाने त्यांचा पिंड घडत गेला, साहित्यविषयक दृष्टी विकसित होऊ लागली. वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे अनंतराव मुंबईत आले.
नोकर्या
१९३५ ते १९४२ या काळात अंतरकर लेखन, वाचन आणि संपादन याच्याशी संबंधित अशा नऊ नोकर्या करत होते. त्यामध्ये प्रभात, मौज, सत्यकथा, आहार, वसंत या नियतकालिकांचा समावेश होता. त्याच काळात ते आकाशवाणीसाठीही लेखन करत होते आणि 'भाषणेही सादर करत होते. याच काळात त्यांची 'चोरटे हल्ले' आणि 'गाळीव रत्ने' ही अभिजात विनोदाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली होती.
१९३८ सालामध्ये अनंतरावांवर सत्यकथा मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी ते केवळ २७ वर्षांचे होते. सत्यकथेचे कार्यकारी संपादक म्हणून काम करताना त्यांनी अनेक नवीन लेखकांना संधी दिली. त्यांतले अरविंद गोखले, दि.बा. मोकाशी, जी.ए. कुलकर्णी हे लेखक पुढे मराठी साहित्याच्या क्षेत्रात नामवंत झाले.