"के.रा. छापखाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
के.रा. छापखाने यांनी नयनतारा हे नाटक नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले, कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी लिहिले. नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्याचा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असल्याचा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता. |
के.रा. छापखाने यांनी नयनतारा हे नाटक नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले, कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी लिहिले. नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्याचा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असल्याचा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता. |
||
विसू : महाराष्ट्र टाइम्सच्या २५ जानेवारी २००८च्या अंकात ’दिनविशेष’ या मथळ्याखाली के.रा. छापखाना यांची जन्मतारीख २५ जानेवारी १८९५ अशी दिली आहे. ती जर खरी मानायची झाली तर छापखाने यांनी नयनतारा वयाच्या ११व्या वर्षी लिहिले असे होईल. त्यामुळे ती तारीख अस्वीकारार्ह आहे. |
|||
==के.रा. छापखाने यांनी लिहिलेली पुस्तके== |
==के.रा. छापखाने यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
ओळ १६: | ओळ १८: | ||
[[वर्ग:मराठी नाटककार]] |
[[वर्ग:मराठी नाटककार]] |
||
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म]] |
||
[[वर्ग: इ.स. १९४० मधील मृत्यू]] |
[[वर्ग: इ.स. १९४० मधील मृत्यू]] |
१३:४४, २६ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
शेक्सपियरच्या रोमियो अॅन्ड ज्युलिएट या नाटकाचे ’नयनतारा’ या नावाचे मराठी रूपांतर करणारे केशव रामचंद्र छापखाने (जन्म : २७ नोव्हेंबर १८७५; मृत्यू : सांगली, १३ फेब्रुवारी १९४०) हे एक मराठी पत्रकार, नाटककार व लेखक होते. यांचे मूळ आडनाव कानिटकर. परंतु त्यांचे खापरपणजोबा गंगाधर रामचंद्र यांचेपासून छापखाने हेच नाव रूढ झाले.
के.रा. छापखाने यांचे शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आणि नंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजात झाले. ते एम.ए. एल्एल.बी. होते. हे सर्व शिक्षण त्यांनी शिष्यवृत्त्या आणि स्वकष्टार्जनाने केले होते. एल्एल.बी.नंतर त्यांनी सांगलीत येऊन यशस्वी वकिली केली. लोकमान्य टिळकांचे ते चांगले स्नेही होते. छापखाने एक नामांकित वक्ते होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचाही व्यासंग होता. डॉ. अॅनी बेझंट यांच्या संपर्कात आल्याने त्यांना थिऑसॉफीच्या अंतर्वतुळात प्रवेश मिळाला होता. सांगलीतल्या थिऑसॉफिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते.
के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ (की १९०८?) साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
के.रा. छापखाने यांनी नयनतारा हे नाटक नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले, कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी लिहिले. नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्याचा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असल्याचा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता.
विसू : महाराष्ट्र टाइम्सच्या २५ जानेवारी २००८च्या अंकात ’दिनविशेष’ या मथळ्याखाली के.रा. छापखाना यांची जन्मतारीख २५ जानेवारी १८९५ अशी दिली आहे. ती जर खरी मानायची झाली तर छापखाने यांनी नयनतारा वयाच्या ११व्या वर्षी लिहिले असे होईल. त्यामुळे ती तारीख अस्वीकारार्ह आहे.
के.रा. छापखाने यांनी लिहिलेली पुस्तके
- जे. कृष्णमूर्ति संदेश-परिचय’ (१९३४)
- स्वाध्याय ज्ञानेश्वरी : राजाराम कॉलेजमधील व्याख्यान-मालिकेसाठी केलेली टिपणे, मुद्रित स्वरूपात (१९३३-३४)
- प्रणवसंदेश - मुद्रित झालेले, पण अधिकृतरीत्या प्रकाशित न झालेले पुस्तक.
- मोहनतारा (नाटक, शेक्सपियरच्या रोमियो अॅन्ड ज्युलिएटचे मराठी रूपांतर (१९०८)