Jump to content

"गीता साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:
==बालपण==
==बालपण==
गीता साने या लहानपणापासूनच फार बंडखोर होत्या. त्या सहसा कुणाला वेणी घालू देत नसत. खूप घट्ट वेणी घालून केस दुखतात म्हणून. तसेच, फार कढत पाणी घालतात म्हणून न्हायला घातलेले त्यांना आवडत नसे. झाडावर, अंगणाच्या पावसाने विरघळू शकेल अश्या कच्च्या भिंतीवर चढणे हे आवडते उद्योग.

गीता साधारण चार वर्षांची असताना वडिलांनी मराठी वर्णमाला आणून भिंतीवर लावली होती. तिला खांद्यावर घेऊन ते अक्षरे दाखवीत. शाळेत जायच्या आधीच तिला चांगले वाचता येऊ लागले. आकड्यांची ओळखदेखील अर्थात झाली.

गीताला भाऊंनी सहाव्या वर्षी शाळेत घातले. ती मिशनरींची शाळा, गावाबाहेर होती. बैलगाडीने जावे लागे. गीताला शाळा आवडली. तरी एक दिवस ती रडत घरी आली. आईने विचारले तेव्हा सांगितले की तिला वर्गातून काढून दुसरीकडे बसवले. मारकुट्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिक्षकांनी केलेली ही शिक्षा कशासाठी केली ते तिला कळले नव्हते. भाऊसाहेब कोर्टातून आले. हळूच गोदावरीबाईंनी गीता रडत आल्याचे त्यांना सांगितले. ते पुन्हा कोट टोपी घालून मास्तरांच्या घरी गेले. तिथे त्यांना समजले की गीताला डबल प्रमोशन - एक इयत्ता गाळून पुढल्या वर्गात प्रवेश मिळाला होता. नवी पुस्तके घेऊन वडील घरी आले आणि गीताचे रडे मावळले.

==हिंगण्याचे शिक्षण==
१९२० साली गीताच्या वडिलांनी गीता-सीताला हिंगण्यास ठेवण्याचे ठरवले. प्रवास वेळखाऊ व त्रासदायक होता. वाशीम ते अकोला बस; पुढे मुुंबईची आगगाडी व कल्याणला उतरून पुणे व पुढे टांग्याने हिंगणे. गीता-सीताला प्रत्येकी दोन परकर, एक पोलके व एक गाठीची चोळी त्यांच्या आईने हातात शिवून दिली. जमेल तेव्हा आणखी एकेक पोलके शिवायचे कबूल केले. रात्री पोलके धुवून वाळत घालायचे व चोळी वापरायची, सकाळी पुन्हा तेच पोलके घालायचे. सहा महिन्यांनी गोदावरीबाई आणखी एकेक पोलके शिवू शकल्या. तोवर पहिली विरली होती.

हिंगण्याला एक वेगळेच विश्व गीताला दिसले. तिथल्या मोकळया वातावरणाची छाप कायम तिच्या मनावर बसली.

२०:१४, २४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

गीता जनार्दन साने (जन्म : वाशीम, ३ सप्टेंबर १९०७; मृत्यू : १२ सप्टेंबर १९९१) या मराठीतील एक बंडखोर कादंबरीकार होत्या.

त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांचे विषय हे भारतीय कुटुंबसंस्थेतील दोष, त्यांच्या मर्यादा आणि त्यात स्त्रीच्या होणाऱ्या घुसमटीसंदर्भातील होते. स्त्रीच्या अंत:करणातील स्वातंत्र्याच्या ऊर्मीची जाणीव साने यांनी आपल्या कादंबर्‍यांतून सातत्याने प्रकट केल्यामुळे त्या तत्कालीन काळात बंडखोर ठरल्या.

आई-वडील

गीता साने यांच्या आईचे नाव भागीरथी.. पण त्यांना माहेरच्या नावाने, गोदावरी म्हणून ओळखत. गीताचा जन्म झाला तेव्हा आई २३ वर्षांच्या आणि वडील २८ वर्षांचे होते. आईची गीताच्या अगोदरची तीन मुले बालपणीच दगावली होती. वडील जनार्दन भालचंद्र साने. त्यांना घरात भाऊ व बाहेर भाऊसाहेब म्हणत. त्यांना भगवद्‌गीता फार प्रिय म्हणून त्यांनी या कन्येचे नाव गीता ठेवले. त्यावेळी वडील शिकत होते. घरची गरिबी, पदरी बायको, विधवा आई. म्हणून एक वर्ष शिक्षकाची नोकरी करायची, एक वर्ष शिकायचे असे करून बारा वर्षांत बी.ए. एल्एल.बी. झाले. त्यांचे शिक्षण मुंबईला विल्सन, पुण्याला फर्ग्युसन आणि बडोद्याच्या व नागपूरच्या कॉलेजांत झाले. गीताची धाकटी बहीण सीता सहा महिन्यांची असताना वडील आधी शिक्षक असलेले वडील आता वकिली करू लागले.

गीता साने यांची आई आणि वडील दोघेही अतिशय प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने कोणत्याही धार्मिक अवडंबरखेरीज प्रत्येकी दीड-दीड रुपयांत केली.

बालपण

गीता साने या लहानपणापासूनच फार बंडखोर होत्या. त्या सहसा कुणाला वेणी घालू देत नसत. खूप घट्ट वेणी घालून केस दुखतात म्हणून. तसेच, फार कढत पाणी घालतात म्हणून न्हायला घातलेले त्यांना आवडत नसे. झाडावर, अंगणाच्या पावसाने विरघळू शकेल अश्या कच्च्या भिंतीवर चढणे हे आवडते उद्योग.

गीता साधारण चार वर्षांची असताना वडिलांनी मराठी वर्णमाला आणून भिंतीवर लावली होती. तिला खांद्यावर घेऊन ते अक्षरे दाखवीत. शाळेत जायच्या आधीच तिला चांगले वाचता येऊ लागले. आकड्यांची ओळखदेखील अर्थात झाली.

गीताला भाऊंनी सहाव्या वर्षी शाळेत घातले. ती मिशनरींची शाळा, गावाबाहेर होती. बैलगाडीने जावे लागे. गीताला शाळा आवडली. तरी एक दिवस ती रडत घरी आली. आईने विचारले तेव्हा सांगितले की तिला वर्गातून काढून दुसरीकडे बसवले. मारकुट्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिक्षकांनी केलेली ही शिक्षा कशासाठी केली ते तिला कळले नव्हते. भाऊसाहेब कोर्टातून आले. हळूच गोदावरीबाईंनी गीता रडत आल्याचे त्यांना सांगितले. ते पुन्हा कोट टोपी घालून मास्तरांच्या घरी गेले. तिथे त्यांना समजले की गीताला डबल प्रमोशन - एक इयत्ता गाळून पुढल्या वर्गात प्रवेश मिळाला होता. नवी पुस्तके घेऊन वडील घरी आले आणि गीताचे रडे मावळले.

हिंगण्याचे शिक्षण

(अपूर्ण)