Jump to content

"निंबा कृष्ण ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: निंबा कृष्ण ठाकरे (एन.के. ठाकरे) (जन्म : मोराणे-धुळे जिल्हा, २२ एप्रि...
(काही फरक नाही)

२३:५९, २४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

निंबा कृष्ण ठाकरे (एन.के. ठाकरे) (जन्म : मोराणे-धुळे जिल्हा, २२ एप्रिल, १९३८) हे पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे अध्यक्ष, माजी गणित विद्याशाखेचे प्रमुख, जागतिक कीर्तीचे गणिती आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते. सन १९९६मध्ये ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले.

एन.के. ठाकरे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून गणितात डॉक्टरेट मिळविणारे पहिले विद्यार्थी होते. ते एक नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण संस्थांचे यशस्वी शासक होत.

कौटुंबिक माहिती

वाडवडिलांमध्ये शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना एन.के. ठाकरे आणि त्यांचे तीन भाऊ उच्चशिक्षित झाले. हयात असलेल्या चार भावांपैकी मोठे एन.के. ठाकरे कुलगुरू, दुसर्‍या क्रमांकावरचे वसंतराव कृषितज्ज्ञ (वृक्षमित्र म्हणून ६० पुरस्कार व पर्यावरणासंबंधी २१ पुस्तकं प्रसिद्ध), तिसरे जगन्नाथ धुळ्यातील नामवंत शल्यचिकित्सक व चौथे शरदराव हे सोलापुरातील प्रथितयश उद्योगपती आहेत.

एन.के. ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील मोराणे गावी झाले. त्यांचे काका दशरथ पाटील क्रांतिकारक होते. बेचाळीसच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्यामुळे विनोबा भावे, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान अशी मातब्बर मंडळी गावात येत. त्यांच्या भाषणांतले विचार बालवयातच ठाकरे यांच्या मनावर बिंबले.

शैक्षणिक कारकीर्द

ग.प्र. प्रधानांचा आदर्श समोर असल्याने, शिक्षण क्षेत्रातच काम करायचे ठाकरे यांनी ठरवले. घरची खूप शेती होती. दूधदुभत्याला कमी नव्हते. पण रोख पैसा नसायचा, त्यामुळे एका शाळेत पूर्ण वेळ शिकवता-शिकवता ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्‌‍सी.. झाले. या परीक्षेत गणितात पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना मुंबईतील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात सहज नोकरी मिळाली. पुढे मुंबईतीलच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मिठीबाई कॉलेज अशा नोकर्‍या करून एन.के. ठाकरे गोव्यातील चौगुले कॉलेजमध्ये लागले. अंती १९६९ पासून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गणिताचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले, आणि आठ वर्षांनी निवृत्त झाले..




पुरस्कार

  • पुणे विद्यापीठात "एन.के. ठाकरे गौरव समिती"ने गोळा केलेल्या निधीतून "गणित रत्‍न" नावाचा पुरस्कार ठेवण्यात आला आहे. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीने निवडलेल्या नामवंत गणितज्ञाला हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो.