Jump to content

"मनोहर नरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मनोहर नरे (जन्म : इ.स. १९३८; मृत्यू : १४ ऑक्टोबर, १९१४) हे एक मराठी नाट...
(काही फरक नाही)

१५:०७, १५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

मनोहर नरे (जन्म : इ.स. १९३८; मृत्यू : १४ ऑक्टोबर, १९१४) हे एक मराठी नाट्यनिर्माते होते. ते मुंबईतील शिवाजी मंदिर न्यासाचे विश्वस्त होते. २३ जानेवारी १९८० रोजी नरे यांनी ओम्‌ नाट्यगंधा नावाची नाट्यसंस्था काढली. या संस्थेद्वारे त्यांनी अनेक मराठी नाटके रंगभूमीवर आणली. नाटकाशी संबंधित असे ’जिंकूदाही दिशा’ आणि मांगल्याचं लेणं’ हे कार्यक्रमही त्यांच्या नाट्यसंस्थेने रंगमंचावर सादर केले होते. नृत्यांगना सुरेखा पुणेकर या नरे यांच्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आल्या.

मनोहर नरे हे एके काळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष होते.

’माझ्या जीवनाचा नूर’ हे मनोहर नरे यांचे आत्मचरित्र अरुण धाडीगावकर यांनी शब्दबद्ध केले आहे.

मनोहर नरे यांच्या ओम्‌ नाट्यगंधा या संस्थेची निर्मिती असलेली मराठी नाटके

  • आई रिटायत होते
  • गाढवाचं लग्न
  • वस्त्रहरण (या मालवणी नाटकाचे ६०० प्रयोग ’ओम्‌ नाट्यगंधा’न्र केले.)
  • वासूची सासू
  • सानेचे काय झाले