"सानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सानिया या मराठीतील एक कथालेखिका आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी असे... |
(काही फरक नाही)
|
१३:१२, २ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
सानिया या मराठीतील एक कथालेखिका आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी असे साहित्यप्रकार हाताळत आशयघन आणि प्रयोगशील असे लेखन त्यांनी केले आहे.
१९६८ साली ’हरवलेली पाऊलवाट’ ही त्यांची पहिली कथा ’श्री’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने कथालेखन केले. १९६८ ते१९७५ या काळात सानियांच्या कथा ’स्त्री’, ’मनोहर’, ’किर्लोस्कर’, ’युगवाणी’ आदी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या. सन १९७५नंतर ’सत्यकथा’, ’मौज’ या मासिकांतून केलेले त्यांचे कथालिखाण लक्षणीय ठरले. पुढे ’हंस’, ’दीपावली’, ’साप्ताहिक सकाळ’, ’मिळून सार्याजणी’, ’माहेर’, ’कालनिर्णय’, ’अक्षर, ’अनुभव’ आदी नियतकालिकांमधून सानियांच्या कथांना विशेष प्रसिद्धी मिळाली. इ.स. २०१४पर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
सानिया यांची प्रकाशित पुस्तके
- अवकाश (कादंबरी)
- अशी वेळ (कथासंग्रह-२०१४)
- आवर्तन (कादंबरी)
- ओमियागे (कथासंग्रह)
- ओळख (कथासंग्रह)
- खिडक्या (कथासंग्रह)
- दिशा घरांच्या (कथासंग्रह)
- परिणाम (कथासंग्रह)
- प्रतीती (कथासंग्रह)
- प्रवास (ललित लेखन)
- प्रयाण (कथासंग्रह)
- भूमिका (कथासंग्रह)
- वलय (कथासंग्रह)
- वाटा आणि मुक्काम (ललित लेखन-सहलेखन)
- शोध (कथासंग्रह-१९८०)
- स्थलांतर (कादंबरी)