"एचएमटी सोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एचएमटी सोना ही भारतात पिकणार्‍या तांदुळाची एक जात आहे. हिचा शोध च...
(काही फरक नाही)

१६:४६, १६ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

एचएमटी सोना ही भारतात पिकणार्‍या तांदुळाची एक जात आहे. हिचा शोध चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या छोट्या गावातील दादाजी खोब्रागडे यांनी लावला.

दादाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजापणाच्या खर्चासाठी आपली तीन एकर भाताची शेती विकली. सुनेच्या बडिलांनी मुलीच्या नावाने दिलेल्या दीड एकर शेतीवरती घरातल्या सहा जणांचा चरितार्थ चालविणे अवघड होते. बरा होऊनही चालू फिरू न शकणारा मुलगा असल्याने घर चालविण्याबरोबरच नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दादाजी आपली शेती सांभाळून दुसर्‍याच्या शेतीवर मजुरी करू लागले. लौकिक अर्थाने शेतीतज्ज्ञ नसणार्‍या दादाजींनी आपल्या शेतात हेक्टरी ३५-४० क्विंटल धानाचे उत्पन्‍न घेतले.

इ.स. १९८३ साली दादाजींनी शेतात ’पटेल ३’ या जातीच्या धानाची लागवड केली. पिकाचे सूक्ष्म निरीक्षण कराताना त्यांनी धानाच्या तीन रोपांच्या पांढर्‍या लोंबीवर पिवळे ठिपके दिसले. या तीन रोपांचे बी वेगळे काढून त्यांनी पुढील हंगामात त्याच बियांची पेरणी केली. हे धानाचे पीक आवडल्याने दादाजींनी त्याचेच बीजगुणन चालू ठेवले. आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी ते आवडल्याने मागून नेले आणि काही वर्षांतच सर्वमान्य झाले. धानाच्या त्या जातीला त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ’एचएमटीसोना’ या घड्याळ्याचे नाव देण्यात आले.

धानाच्या या एचएमटी सोना जातीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातले ते नागभीड गाव आणि दादाजी खोब्रागडे यांना राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागए. या धानाच्या संशोधनासाठी दादाजींना राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते५० हजार रुपयांचे पारितषिक मिळाले.

तांदुळाच्या जाती

एकेकाळी महाराष्ट्रात विविध चवींच्या आणि विविध गुणदोषांच्या अनेक जातींचे तांदूळ पेरले जात. रासायनिक खते आणि जंतुनाशकांच्या सवंग वापराने, सरकारच्या आणि शेतकर्‍यांच्या अनास्थेने अनेक जाती लुप्तप्राय झाल्या, अनेक जातींच्या तांदुळाच्या भाताची चव बदलली. पुण्याच्या जवळपास भोर, नसरापूर आणि कामशेट येथे पिकणारा सुवासिक आंबेमोहर तांदूळ दिसेनासा झाला.

महाराष्ट्रातील तांदुळाच्या अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या जाती
  • आंबेमोहर
  • कमोद
  • कोलम
  • चिमणसाळ
  • चिन्नोर