"अरविंद व्यंकटेश गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १६: | ओळ १६: | ||
* परदेशात शिकायचंय? |
* परदेशात शिकायचंय? |
||
* पाकिस्ताननामा |
* पाकिस्ताननामा |
||
* पाकिस्तानात साठ वर्षे (बिय्याथिल मोईदिन ऊर्फ बी. एम. कुट्टी यांनी लिहिलेल्या ’सिक्स्टी इयर्स इन सेल्फ एक्साइल : नो रिग्रेट्स' हे आत्मचरित्राचा मराठी अनुवाद. सहअनुवादक विजय लोणकर) |
|||
* मंडालेचा राजबंदी |
* मंडालेचा राजबंदी |
||
* संपादन . |
* संपादन . |
१८:१८, १२ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
अरविंद व्यंकटेश गोखले हे ’दैनिक केसरी'चे बारावे संपादक. तेथे ते दहा वर्षे सलग संपादकपदी होते. त्यानंतर ते दैनिक ’लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक झाले. गोखल्यांची संपादकीय कारकीर्द ३६ वर्षांहून अधिक आहे.
शिक्षण
अरविंद व्यं गोखले हे आधी इतिहास हा विषय घेऊन एम.ए.झाले. लंडनच्या 'कॉमनवेल्थ प्रेस युनियन'ची 'हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप' (१९७९) आणि वॉशिंग्टनच्या 'द हेन्री एल स्टिम्सन सेंटर'ची फेलोशिप (१९९८) मिळवून त्यांनी अनुक्रमे पत्रकारिता आणि भारत-पाकिस्तान संबंध यावर संशोधन केले. आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषत: भारत-पाकिस्तान संबंध हे अरविंद व्यं गोखले यांचे अभ्यासाचे खास विषय होत. आपल्यालेखनासाठी त्यांनी अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया यांसह अनेक देशांचे अभ्यासदौरे केले. भारताच्या पंतप्रधानांसमवेतही त्यांनी पाच देशांना भेटी दिल्या.
अरविंद व्यं गोखले हे पत्रकारिता अभ्यासक्रमांचे मानद व्याख्याते आहेत.
अरविंद व्यं. गोखले यांनी लिहिलेली पुस्तके
- अमेरिकेत शिकायचंय?
- अक्षरांजली
- आय.सी.८१४ (कादंबरी)
- कारगिल ते कंदाहार
- परदेशात शिकायचंय?
- पाकिस्ताननामा
- पाकिस्तानात साठ वर्षे (बिय्याथिल मोईदिन ऊर्फ बी. एम. कुट्टी यांनी लिहिलेल्या ’सिक्स्टी इयर्स इन सेल्फ एक्साइल : नो रिग्रेट्स' हे आत्मचरित्राचा मराठी अनुवाद. सहअनुवादक विजय लोणकर)
- मंडालेचा राजबंदी
- संपादन .
अरविंद व्यं गोखले यांना मिळालेले पुरस्कार
- आचार्य अत्रे पारितोषिक
- साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिक
- कै. बाबूराव ठाकूर पत्रकारिता पुरस्कार ,
- मराठी भाषाविषयक माध्यमरत्न पुरस्कार
- पत्रकार कै. वरुणराज भिडे पुरस्कार
- कै. सुशीलादेवी देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
पहा : गोखले