"पत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मंगळागौर, हरतालिका आदी देवींच्या पूजेच्या वेळी त्यांना पत्री वा... |
(काही फरक नाही)
|
१५:३६, ३ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
मंगळागौर, हरतालिका आदी देवींच्या पूजेच्या वेळी त्यांना पत्री वाहण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. गणेश पूजनादरम्यानसुद्धा अशाच प्रकारे २१प्रकारच्या पत्री वाहतात. या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे मानवाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढय़ांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे. गणपतीला कोणत्या पत्री वाहायच्या असतात, त्या पत्रींचे औषधी गुणधर्म कोणते, याची माहिती देणारा हा लेख.