Jump to content

"एकनाथ केशव ठाकूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एकनाथ केशव ठाकूर (जन्म : म्हापण-वेंगुर्ले तालुका, १५ फेब्रुवारी १...
(काही फरक नाही)

१८:१४, १० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

एकनाथ केशव ठाकूर (जन्म : म्हापण-वेंगुर्ले तालुका, १५ फेब्रुवारी १९४१; मृत्यू : ७ ऑगस्ट २०१४) हे सारस्वत बँकेचे अध्यक्ष होते.

एकनाथ ठाकूर एक वर्षाचे असताना त्यांची आईचे तर दोन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या भावंडांना जास्त शिक्षण घेता आले नाही. सर्व भावंडांत लहान असलेले एकनाथ जन्मत:च हुशार असल्याने त्यांनी पुढे शिकावे, अशी सर्व भावंडांची इच्छा होती. त्याप्रमाणे कुडाळ शहरात राहणाऱ्या मोठया बहिणीच्या घरी शिक्षणासाठी येऊन कुडाळ हायस्कूलमधून एकनाथ एसएससी परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. पण बहिणीच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी कुडाळमधील दुकानात ९ वर्षे काम केले. कुडाळ हायस्कूलमधील इंग्रजीचे अध्यापक अप्पा आंगचेकर यांच्यामुळे एकनाथ ठाकूर यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली व इंग्रजी विषयाचा सातवीपासूनच त्यांनी विशेष अभ्यास केला. पुढे पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून प्रामुख्याने इंग्रजी हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून बी. ए. पदवी प्राप्त केली. त्यांच्या शालेय शिक्षणासाठी समाजाच्या विद्यावृद्धी संस्थेतून त्यांना अकरावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळत होती. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे शहरात शेतकी खात्यात नोकरी करून पूर्ण केले. त्यानंतर एम.ए. करीत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून बँकेत १९६६ साली थेट अधिकारी पदावर नियुक्त झाले.



(अपूर्ण)