Jump to content

"बालगुन्हेगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८: ओळ १८:


;जपान:
;जपान:
जपानमध्ये २० वर्षे वयापर्यंतच्या मुलांना अजाण समजले जाते, परंतु तेथे गंभीर गुन्ह्यांसाठी याहून लहान मुलांनाही अपराधी समजले जाते. २०१०साली ऑस्ट्रेलियात १९ वर्षे वयाच्या मुलाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली होती. त्या मुलाने दोन स्त्रियांची हत्या केली होती. जपानमध्ये १२ वर्षे वयाच्या मुलाला करारमदार करण्याचा किंवा मृत्युपत्र करण्याचा अधिकार मिळतो, त्यमुळे गंभीर गुन्ह्यांसाठी १५ वर्षाच्या वयातही कडक शिक्षा होऊ शकते. तैवान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमध्ये साधारणपणे असेच कायदे आहेत.


;भारत‌‌:
;भारत‌‌:

११:१७, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती

विविध देशात किती लहान वयात केलेल्या अपराधांना गुन्हा समजायचे त्याचे वेगवेगळे कायदे आहेत. माणसाचे वय ठरविण्याच्यापाा दोन पद्धती आहेत, एक क्रोनॉलॉजिकल आणि दुसरी बायॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल म्हणजे जन्मतारखेपासून मोजायची वर्षे, आणि बायॉलॉजिकल म्हणजे व्यक्तीचे मानसिक वय. मानसिक वय हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर आधारलेले असते. व्यक्ती ज्या परिस्थितीत आहे आणि तिची मानसिक अवस्था कशी आहे यानुसार व्यक्तीत शारीरिक बदल झालेले असतात. त्यामुळे अनेकदा लहान वयाचा माणूस प्रौढ माणसासारखा आणि त्याउलट वयाने मोठा असलेला माणूस लहान मुलासारखा वागत असतो. म्हणून लहान वयात केलेल्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराचे शारीरिक वय न घेता त्याचे मानसिक वय विचारात घ्यावे असे जगात अनेक देशांत मानले जाते. गंभीर गुन्ह्यांचा संदर्भात अपराध्याचे मानसिक वयच विचारात घ्यावे असे भारतीय वैद्यक संघटनेचे म्हणणे आहे.

बाल-अपराध्यांना गुन्हेगार समजण्याच्या विविध देशांतील पद्धती

अमेरिका

अमेरिकेत साधारणपणे १८ वषे वयाखाली व्यक्तींना किशोर समजले जाते, परंतु किशोरवयातील व्यक्तीने जर एखादा गंभीर अपराध केला असेल, तर त्याचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टातून मोठ्या वयाच्या गुन्हेगारांचे खटले चालविणाऱ्या कोर्टात पाठविला जातो. अशा तथाकथित अजाण मुलांना जन्मठेपही होऊ शकते.

अमेरिकेत याबाबत विविध राज्यांत वेगवेगळे कायदे आहेत. न्यूयॉर्क, नॉर्थ व साऊथ कॅरोलिना, न्यू हॅम्प‌‌शायर आणि टेक्सास या राज्यांत १७ वर्षाहून कमी वयाच्या मुलांना किशोर समजले जाते, परंतु गंभीर अपराध्यांचा बाबतीत १६ वर्षे वयाच्या मुलालाही मोठ्या वयाच्या गुन्हेगारासारखी शिक्षा सुनावली जाते. केंटुकी प्रांतात तर १४ सालच्या मुलालाही अशा परिस्थितीत मोठ्या वयाच्या गुन्हेगारासारखी सजा दिली जाते.

इंग्लंड

इंग्लंडमध्ये १० ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी ज्युव्हेनाईल कोर्ट आहे, तरीही १० वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलाने गंभीर गुन्हा केला तर त्याचा खटला क्राऊन कोर्टात पाठवला जातो. पूर्वी या ठिकाणीही मुलांच्या पुनर्वसनाची तरतूद होती, पण इ‌.स. १९९३मध्ये जेम्स बल्जर नावाच्या मुलाचा १० वयाच्या दोन मुलांनी खून केला, त्यावेळी कायद्यात बदल करण्यात आला, आणि असे खटले ज्युव्हेनाईल कोर्टात चालविणे बंद झाले.

स्कॉटलंडमध्ये १६वर्षापर्यंतच्या मुलांना किशोर समजले जाते, परंतु १२वर्षे वयाच्या मुलालाही गुन्ह्यासाठी जबाबदार समजले जाते. पूर्वी हे वय ८ वर्षे होते.


ऑस्ट्रेलिया‌

ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेप्रमाणे, १२ वर्षाच्या मुलाला सत्कर्म आणि दुष्कर्म यातील फरक समजतो. त्यामुळे अशा मुलाने वाईट काम केले तर त्याला बालगुन्हेगार न समजता सर्वसाधारण गुन्हेगारच समजले जाते. अशा गुन्हेगारांना जशी सजा मोठ्या माणसांना दिली जाते तशीच सजा दिली जाते.

जपान

जपानमध्ये २० वर्षे वयापर्यंतच्या मुलांना अजाण समजले जाते, परंतु तेथे गंभीर गुन्ह्यांसाठी याहून लहान मुलांनाही अपराधी समजले जाते. २०१०साली ऑस्ट्रेलियात १९ वर्षे वयाच्या मुलाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली होती. त्या मुलाने दोन स्त्रियांची हत्या केली होती. जपानमध्ये १२ वर्षे वयाच्या मुलाला करारमदार करण्याचा किंवा मृत्युपत्र करण्याचा अधिकार मिळतो, त्यमुळे गंभीर गुन्ह्यांसाठी १५ वर्षाच्या वयातही कडक शिक्षा होऊ शकते. तैवान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमध्ये साधारणपणे असेच कायदे आहेत.

भारत‌‌


(अपूर्ण)