Jump to content

"बालगुन्हेगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विविध देशात किती लहान वयात केलेल्या अपराधांना गुन्हा समजायचे त्...
(काही फरक नाही)

२३:२७, १८ जुलै २०१४ ची आवृत्ती

विविध देशात किती लहान वयात केलेल्या अपराधांना गुन्हा समजायचे त्याचे वेगवेगळे कायदे आहेत. माणसाचे वय ठरविण्याच्याhee दोन पद्धती आहेत, एक क्रोनॉलॉजिकल आणि दुसरी बायॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल म्हणजे जन्मतारखेपासून मोजायची वर्षे, आणि बायॉलॉजिकल म्हणजे व्यक्तीचे मानसिक वय. मानसिक वय हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर आधारलेले असते. व्यक्ती ज्या परिस्थितीत आहे आणि त्याची मानसिक अवस्था कशी आहे यानुसार तिच्यात शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे अनेकदा लहान वयाचा माणूस प्रौढ माणसासारखा आणि त्याउलट वयाने मोठा असलेला माणूस लहान मुलासारखा वागत असतो. त्यामुळे लहान वयात केलेल्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराचे शारीरिक वय न घेता त्याचे मानसिक वय विचारात घ्यावे असे जगात अनेक देशांत मानले जाते. गंभीर गुन्ह्यांचा संदर्भात अपराध्याचे मानसिक वयच विचारात घ्यावे असे भारतीय वैद्यक संघटनेचे म्हणणे आहे.

बाल-अपराध्यांना गुन्हेगार समजण्याच्या विविध देशांतील पद्धती

अमेरिका

अमेरिकेत साधारणपणे १८ वषे वयाखाली व्यक्तींना किशोर समजले जाते, परंतु किशोरवयातील व्यक्तीने जर एखादा गंभीर अपराध केला असेल, तर त्याचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टातून मोठ्या वयाच्या गुन्हेगारांचे खटले चालविणाऱ्या कोर्टात पाठविला जातो. अशा तथाकथित अजाण मुलांना जन्मठेपही होऊ शकते.

अमेरिकेत याबाबत विविध राज्यांत वेगवेगळे कायदे आहेत. न्यूयॉर्क, नॉर्थ व साऊथ कॅरोलिना, न्यू हॅम्प‌‌शायर आणि टेक्सास या राज्यांत १७ वर्षाहून कमी वयाच्या मुलांना किशोर समजले जाते, परंतु गंभीर अपराध्यांचा बाबतीत १६ वर्षे वयाच्या मुलालाही मोठ्या वयाच्या गुन्हेगारासारखी शिक्षा सुनावली जाते. केंटुकी प्रांतात तर १४ सालच्या मुलालाही अशा परिस्थितीत मोठ्या वयाच्या गुन्हेगारासारखी सजा दिली जाते.

इंग्लंड
ऑस्ट्रेलिया‌
जपान
भारत‌‌


(अपूर्ण)