"रोटरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: 'रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती' यांच्यातर्फे साहित्य परिषदेच्या सहक... |
(काही फरक नाही)
|
१३:२३, ७ मे २०१४ ची आवृत्ती
'रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती' यांच्यातर्फे साहित्य परिषदेच्या सहकार्याने दोन दिवसांचे 'रोटरी मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १० आणि ११ मे २०१४ रोजी पुणे शहरातील सहकारनगरच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हे साहित्य संमेलन होणार असून, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद यांची पर्वणी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. प्रकाश पायगुडे हे स्वागताध्यक्ष आणि साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आहेत.
संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात (१० मे) हृदय शल्यविशारद डॉ. रणजित जगताप, डॉ. सिद्धार्थ नडगे यांना रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. शिकारपूर यांचे 'आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य' या विषयावर व्याख्यान, अभिराम भडकमकर यांची मुलाखत, प्रा. दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम होणार आहे. साहित्य नाटक आणि चित्रपट या विषयावरील परिसंवादात लेखक राजन खान, दिग्दर्शक कांचन नायक, अभिनेत्री शर्वरी जमेनीस, पटकथालेखक संजय पवार सहभागी होणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात हास्यकवी संमेलन होईल. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन, गीतकार प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि रोटरी सदस्यांचा साहित्य रंजन हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रवेशमूल्य आहे.
पहा : साहित्य संमेलने