"दाजीकाका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ (जन्म : ११ सप्टेंबर, १९१५; मृ...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

२१:४०, ७ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ (जन्म : ११ सप्टेंबर, १९१५; मृत्यू : पुणे, १० जानेवारी, २०१४) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफी पेढी पी.एन.गाडगीळ अॅन्ड सन्सचे मालक होते.

मूळचे कोकणातले असणारे हे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थिरावले आणि सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत राहिले. २९ नोव्हेंबर १९३२ रोजी `गणेश नारायण गाडगीळ सराफ व ज्युवेलर्स' या दुकानाचा शुभारंभ झाला. या व्यवसायात थोरले बंधू पु. ना. ऊर्फ आबा गाडगीळ, मधले गणेश नारायण ऊर्फ दादा (हे दाजीकाकांचे वडील) आणि तिसरे बापूकाका अशा तिघांची भागीदारी होती. आबांची सत्शीलता, निर्व्यसनीपणा, समतोल वृत्ती, मितभाषी व्यवहार, जनहिताची तळमळ यांचा खोल ठसा दाजीकाकांवर उमटला. माधुकरीसाठी येणारे विद्यार्थी, जेवायला येणारे वारकरी, वाईचे, काशीचे विद्वान ब्राह्मण, सख्खे, सावत्र, चुलत नातेवाईक, सुना-मुलींचा गोतावळा असा सतत माणसांचा राबता असणाऱया सांगलीच्या घरात दाजीकाकांची जडणघडण झाली. वयाच्या विसाव्या वर्षी दाजीकाकांनी दुकानात पाऊल ठेवले आणि हा परिपाठ पुढे सत्तर वर्षे टिकून राहिला. `आधुनिक पाणिनी' म्हणून संबोधल्या जाणाऱया काशीनाथशास्त्री अभ्यंकर यांची पुण्यात राहणारी बुद्धिमान कन्या कमलाबाई दाजीकाकांच्या पत्‍नी होत.

दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८च्या प्रारंभी 'मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी' या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्‍नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले. संपूर्ण कुटुंबाला व्यवसायात जोडून घेण्याचा धडा देत दाजीकाकांनी सोन्या-चांदीप्रमाणे हिरे-माणके आणि कालानुरूप ज्वेलरीच्या व्यवसायाचे कौशल्यही आत्मसात करून घेतले. हिरे व रत्‍नांचा स्वतंत्र विभागही सुरू केला. ' ब्रँड अॅम्बॅसिडर ' नियुक्त करण्याची दाजीकाकांची कल्पना सराफी व्यवसायात चमकून गेली. बारकोड सिस्टिम, कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड अशा आधुनिक माध्यमातून दाजीकाकांनी व्यवसायातील कालानुरूप व्यवस्थांशी लीलया जुळवून घेतले. गाडगीळांची आता सहावी पिढी या व्यवसायात आहे.

इ.स. १९७१मध्ये दाजीकाकांचे चिरंजीव विद्याधर पुण्याच्या दुकानात कामाला लागले. आणि त्यांच्या लग्नानंतर सूनबाई वैशाली गाडगीळ हिशेबाची बाजू सांभाळू लागल्या. दाजीकाकांचे पुतणे अजित हेही दुकानाचे आधारस्तंभ आहेत. पीएनजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पु.ना.गाडगीळ अॅन्ड सन्स या दुकानाच्च्या आज पुण्यात अनेक शाखा आहेत.

दाजीकाकांचे समाजकार्य

दाजीकाकांनी आपल्या व्यवसाय बंधूंना यशस्वीरीत्या एकत्र आणले. सराफ असोसिएशनचे ते १९८७ साली अध्यक्ष झाले. सराफांतील मतभेद दूर करून सभासदसंख्या वाढविण्याबरोबरच जिल्ह्यांच्या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी सराफांना एकजुटीचं महत्त्व पटवून दिलं. 'सुवर्णपत्र' या नावाने त्यांनी संघटनेचे मुखपत्रही सुरू केले. बदलणारे कायदे- करप्रणालीविषयी सराफांना माहिती करून दिली. व्यवसायात ४० टक्क्यांहून अधिक महिलांना नोकरी देऊन त्यांच्या ' कस्टमर रिलेशन्स ' चे प्रशिक्षणही दिले. ८० वर्षांवरील व्यक्तींसाठीचा शतायू क्लब, गांधर्व महाविद्यालयाच्या वास्तूसाठी भरीव मदत, अंबाजोगाईत भक्तनिवासाची उभारणी, लातूर भूकंपग्रस्तांच्या आयुष्याची फेरउभारणी, बुद्धिबळाच्या प्रसारासाठी संस्था आदींच्या माध्यमातून कला-क्रीडा-संस्कृतीसह सामाजिक आघाडीवर अनेक सेवाभावी संस्थांना ते अखेरपर्यंत मदत करीत होते. पुण्यातील लक्ष्मी रोडवरच्या पे-अँड पार्क कायद्याला दाजीकाकांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था त्याचेच फलित आहे. कलाकारांना रोख बक्षिसे देणे, कार्यक्रमातील पैशाची त्रुटी भरून काढणे, अडचण असणाऱयांना सहज मदत करणे असा त्यांचा सढळ देणारा हात होता.


(अपूर्ण)