Jump to content

"संजय कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संजय दिनकर कुलकर्णी (जन्म : इ.स. १९५०; मृत्यू : सासवड, २५ मार्च, २०१४)...
(काही फरक नाही)

१२:२०, ७ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

संजय दिनकर कुलकर्णी (जन्म : इ.स. १९५०; मृत्यू : सासवड, २५ मार्च, २०१४) हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते. पत्रकारितेमध्ये संजय दिनकर अशी ओळख असलेले कुलकर्णी हे अनेक वर्षे दैनिक केसरीमध्ये उपसंपादक म्हणून काम करीत. केसरीत येण्यापूर्वी ते दैनिक देशदूतविशाल सह्याद्रीत होते. चित्रपट क्षेत्रावरील त्यांचे लेखन विशेष गाजले. जुन्या चित्रपटांविषयी समीक्षा लेखनाबाद्दल त्यांची विशेष ख्याती होती.

पुणे परिसरात दिवाळी अंकाच्या स्पर्धा संयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता.

संजय दिनकर यांची पुस्तके

  • असे चित्रपट अशा आठवणी (चित्रपटविषयक)
  • झंझावात (आचार्य अत्रे यांच्या जीवनावरी कादंबरी)
  • झुंज (लघुकथासंग्रह)
  • नगर वधू (कादंबरी)
  • बंटी दि ग्रेट (बालगीते)
  • बडबडगाणी बंट्याची (बालकवितासंग्रह)

संजय कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

  • सासवडच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार.