Jump to content

"शंकरराव रामचंद्र कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:


==पुरस्कार==
==पुरस्कार==
गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मरणार्थ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दरवर्षी एक पुरस्कार देते. १९१४साली हा पुरस्कार डॉ. [[ह.वि. सरदेसाई]] यांना मिळाला.
* गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मरणार्थ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दरवर्षी एक पुरस्कार देते. १९१४साली हा पुरस्कार डॉ. [[ह.वि. सरदेसाई]] यांना मिळाला.
* महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्या दरवर्षी होणाऱ्या शास्त्रीय गायन स्पर्धेनंतर पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयाला शंकरराव कानिटकर फिरता स्मृती करंडक प्रदान केला जातो.

----
----
{{DEFAULTSORT:कानिटकर, शंकर रामचंद्र}}
{{DEFAULTSORT:कानिटकर, शंकर रामचंद्र}}

१७:२५, २९ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

गुरुवर्य शंकरराव रामचंद्र कानिटकर (जन्म : रत्नागिरी, ११ जुलै १८८७; मृत्यू : पुणे, २५ जानेवारी १९६४) हे एक मराठी शिक्षक, प्राध्यापक आणि समाजसेवक होते. त्यांची आयुष्याची ६५ वर्षे पुणे शहरात गेली. सतत १८ वर्षे ते पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते. पुण्यामध्ये शंकरराव कानिटकरांनी इ.स. १९३४साली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची आणि मॉडर्न हायस्कूलची स्थापना केली.

शिक्षण आणि अध्यापनव्यवसाय

शंकरराव कानिटकरांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील शनिवार म्युनिसिपल शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण, इ.स. १८८८ ते १९०४ या काळात, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होऊन १९०४मध्ये ते मॅट्रिक झाले. फर्ग्युसन कॉलेजमधून १९०९मध्ये बी.ए. झाल्यापासून त्यांनी विविध शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या नोकऱ्या केल्या. एम.ए. झाल्यानंतरच्या १९१४ ते १९२८ या काळात शंकरराव कानिटकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते, तर १९३४ ते १९४६ या काळात मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक होते.

शंकरराव कानिटकरांचे समाजकार्य

  • इसवी सन १९२५ ते सन १९४२पर्यंत (अठरा वर्षे) शनिवार पेठ मतदार संघातर्फे निवडलेले पुणे नगरपालिकेचे सभासदत्व.
  • इसवी सन १९२५ ते१९३९पर्यंत पुणे शहर म्युनिसिपल स्कूल बोर्डाचे सभासद, व शेवटी एक वर्ष चेअरमन.
  • इ.स. १९४१-१९४२मध्ये पुणे शहर नगरपालिकेचे सर्व पक्षांच्या एकमताने निवडलेले अध्यक्ष.
  • इ.स. सन १९२५ ते १९४५पर्यंत मुंबई विद्यापीठ व सरकारी शाळाखाते यांजकडून प्रॉव्हिन्शिअल टेक्स्टबुक कमिटी व मराठी स्कूलबुक कमिटी ह्यांवर सभासद म्हणून निवड.
  • सन १९२५पासून कित्येक वर्षे मॅट्रिक्युलेशन व बी.टी. परीक्षांकरिता मुंबई विद्यापीठाकडून परीक्षक म्हणून नेमणूक.
  • इ.स. १९३१पर्यंत डेक्कन ग्रूप ऑफ हेडमास्टर्सचे पहिले प्रतिनिधी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या सेनेटचे सभासद.
  • मॉडर्न हायस्कूल या संस्थेकरिता शिवाजीनगर भागात सव्वा लाख रुपये किंमतीची बारा एकर जमीन मिळविण्याचे कामी व अडीच लाखाच्या चार इमारती बांधण्याचे कामी अविश्रांत व यशस्वी कामगिरी करून सोसायटीच्या शैक्षणिक व्यापात मोठी भर घातली.
  • इ.स. १९४६मध्ये सरकारी शिक्षण खात्याकडून ह्यांची प्रांतिक स्कूल लीव्हिंग एक्झामिनेशन बोर्ड व बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ह्यांवर सभासद म्हणून नेमणूक झाली.
  • विश्वविद्यालयाकडून हायस्कूलच्या तपासणीकरिता नेमलेल्या कमिट्यांवर अनेकदा निवड.
  • पुण्यात वेळोवेळी भरलेल्या शैक्षणिक परिषदांशी निकट संबंध.
  • सन १९४८ साली प्रसिद्ध झालेल्या कानिटकर कुलवृत्तान्ताचे ते संपादक होते.

ग्रंथलेखन

  • शंकरराव कानिटकर यांनी शाळांसाठी इतिहासाची तीन पुस्तके लिहिली होती.

पुरस्कार

  • गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मरणार्थ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दरवर्षी एक पुरस्कार देते. १९१४साली हा पुरस्कार डॉ. ह.वि. सरदेसाई यांना मिळाला.
  • महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्या दरवर्षी होणाऱ्या शास्त्रीय गायन स्पर्धेनंतर पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयाला शंकरराव कानिटकर फिरता स्मृती करंडक प्रदान केला जातो.