Jump to content

"विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|विष्णुशास्त्री बापट}} '''विष्णुशास्त्री बापूशास्त्री बाप...
(काही फरक नाही)

२२:१६, २५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती


विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट (जन्म : इ.स. १८०४;मृत्यू : इ.स. १८६५) हे एक संस्कृत पंडित होते. त्यांच्या वडिलांची संस्कृत पाठशाळा होती.

विष्णुशास्त्रींना देखील इ.स. १८३७ साली पुणे संस्कृत पाठशाळेत ’असिस्टंट पंडित’ म्हणून नोकरी मिळाली. पुढे इ.स. १८३८मध्ये ते प्रमुख अध्यापक झाले. शिक्षण मंडळाच्या त्या नोकरीत असताना विष्णुशास्त्र्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली.

मुंबई सरकारचा मुख्य सचिव डब्ल्यू. एच्‌. वॉथेन ह्याने मुळात इंग्रजीत लिहिलेल्या आणि पंधरा भागात असलेल्या पुस्तकाचा विष्णुशास्त्र्यांनी ’नीतिदर्पण’ या नावाचा मराठी अनुवाद केला. मराठी शाळांवर पढणाऱ्या मुलांस नीतिज्ञान व्हायाजोगे ग्रंथ फार थोडे आहेत, असा अभिप्राय मनात आणून...’ हा ग्रंथ केल्याचे खुद्द विष्णुशास्त्री बापटांनी म्हटले आहे. मात्र या पुस्तकातली भाषा मुलांना कळायला थोडी अवघडच होती.

विष्णुशास्त्री बापट यांनी लिहिलेली पुस्तके

  • नीतिदर्पण (१८३७)
  • बालकांस हितोपदेशाच्या कथा (१९३८)
  • महाराष्ट्र भाषेचे क्षेत्रफळ घनफळ (१८३८)