Jump to content

विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विष्णूशास्त्री बापूशास्त्री बापट (जन्म : इ.स. १८०४; - इ.स. १८६५) हे एक संस्कृत पंडित होते. त्यांच्या वडिलांची संस्कृत पाठशाळा होती.

विष्णूशास्त्रींना देखील इ.स. १८३७ साली पुणे संस्कृत पाठशाळेत ’असिस्टंट पंडित’ म्हणून नोकरी मिळाली. पुढे इ.स. १८३८मध्ये ते प्रमुख अध्यापक झाले. शिक्षण मंडळाच्या त्या नोकरीत असताना विष्णूशास्त्र्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली.

मुंबई सरकारचे मुख्य सचिव डब्ल्यू. एच्‌. वॉथेन यांनी मुळात इंग्रजीत लिहिलेल्या आणि पंधरा भागात असलेल्या पुस्तकाचा विष्णूशास्त्र्यांनी ’नीतिदर्पण’ या नावाचा मराठी अनुवाद केला. ’मराठी शाळांवर पढणाऱ्या मुलांस नीतिज्ञान व्हायाजोगे ग्रंथ फार थोडे आहेत, असा अभिप्राय मनात आणून...’ हा ग्रंथ केल्याचे खुद्द विष्णूशास्त्री बापटांनी म्हटले आहे. मात्र या पुस्तकातली भाषा मुलांना कळायला थोडी अवघडच होती. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर विष्णूशास्त्री बापूशास्त्री बापट हे ’नीतिदर्पणकार बापट’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

भाषांतरकार, निबंधलेखक व इतिहासलेखक नारायण विष्णूशास्त्री बापट हे विष्णूशास्त्र्यांचे चिरंजीव.

विष्णूशास्त्री बापट यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • नीतिदर्पण (१८३७)
  • बालकांस हितोपदेशाच्या कथा (१९३८)
  • महाराष्ट्र भाषेचे क्षेत्रफळ घनफळ (१८३८)