"सुरेंद्र शिवदास बारलिंगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) छो added Category:मराठी लेखक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे''' (जन्म : २० जुलै, १९१९; मृत्यू : १९ डिसेंबर १९९७) हे एक मराठी लेखक होते. नागपूर विद्यापीठाचे ते पीएच.डी होते. ते पुणे विद्यापीठात, दिल्ली विश्वविद्यालयात, आणि त्यावेळी युगोस्लाव्हियात असणाऱ्या व सध्या क्रोएशियाची राजधानी असलेल्या झाग्रेब शहरातील विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. बारलिंगे यांना तत्त्वज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर एक तत्त्वचिंतक म्हणून लौकिक मिळाला. त्यानिमित्ताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व युगोस्लाव्हिया या देशांमध्ये त्यांचे वास्तव्य झाले. त्यांनी आपला पीएच.डी.नंतरचा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठात केला होता. अंमळनेरच्या भारतीय तत्त्वज्ञान संस्थेचे ते फेलो होते. |
|||
'''सुरेंद्र शिवदास बारलिंगे''' हे मराठी लेखक होते. |
|||
डॉ. सुरेंद्र बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे इ.स.१९८०पासून अध्यक्ष होते. |
|||
डॉ. बारलिंगे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातले(१९३२ व १९४२) एक स्वातंत्र्य सैनिक होते. हैद्राबादच्या मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता(१९४७-४८). अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सचिव होते(१९४०). बारलिंगे हे C.P. and Berar Students’ Federationचे मुख्य सचिव होते(१९४०-४१) अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे व राष्ट्रीय युवक संघाचे ते एक संस्थापक आणि सहसचिव होते.शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्राम संपल्यावर त्यांनी मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. नांदेडच्या पीपल्स कॉलेजची जडण घडण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्या कॉलेजचे ते संस्थापक प्राचार्य होते. तसेच ते आंध्र प्रदेशातील सिद्दीपेठच्या कला व विज्ञान महाविद्यालयाचे, करीमनगरच्या एस.एस.आर. कॉलेजचे आणि हैदराबादमधील नूतन विद्या समितीच्या न्यू सायन्स कॉलेजचेही प्राचार्य होते. या सर्वच काळातील त्यांच्या आठवणी आणि संवेदनशील मनाने टिपलेले जीवनाच्या विविध अंगांचे अनुभव त्यांनी आपल्या ’ओंजळभर’ या आत्मचरित्रात सांगितले आहेत. |
|||
==सुरेश बारलिंगे यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* आकाशाच्या सावल्या |
|||
* इन्किलाब |
|||
* ओंजळभर (आत्मकथन) |
|||
* खरा हा एकची धर्म |
|||
* गोष्टींचे गाठोडे (कथासंग्रह) |
|||
* तर्करेखा (भाग १, २ -सहलेखक : मो.प्र. मराठे) |
|||
* पुन्हा भेटू या (व्यक्तिचित्रे) |
|||
* भारतीय तर्कशास्त्राची रूपरेखा |
|||
* माझा देश (कथासंग्रह) |
|||
* माझे घर (कथासंग्रह) |
|||
* मी पण माझे (कादंबरी) |
|||
* साहित्य आणि संस्कृती |
|||
* सौंदर्याचे व्याकरण |
|||
==सुरेंद्र बारलिंगे यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके== |
|||
* A Modern Introduction to Indian Logic(1965) |
|||
* A Modern Introduction to Indian Aesthetic Theory(2007) |
|||
{{DEFAULTSORT:बारलिंगे,सुरेंद्र शिवदास}} |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
२३:०१, २२ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे (जन्म : २० जुलै, १९१९; मृत्यू : १९ डिसेंबर १९९७) हे एक मराठी लेखक होते. नागपूर विद्यापीठाचे ते पीएच.डी होते. ते पुणे विद्यापीठात, दिल्ली विश्वविद्यालयात, आणि त्यावेळी युगोस्लाव्हियात असणाऱ्या व सध्या क्रोएशियाची राजधानी असलेल्या झाग्रेब शहरातील विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. बारलिंगे यांना तत्त्वज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर एक तत्त्वचिंतक म्हणून लौकिक मिळाला. त्यानिमित्ताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व युगोस्लाव्हिया या देशांमध्ये त्यांचे वास्तव्य झाले. त्यांनी आपला पीएच.डी.नंतरचा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठात केला होता. अंमळनेरच्या भारतीय तत्त्वज्ञान संस्थेचे ते फेलो होते.
डॉ. सुरेंद्र बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे इ.स.१९८०पासून अध्यक्ष होते.
डॉ. बारलिंगे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातले(१९३२ व १९४२) एक स्वातंत्र्य सैनिक होते. हैद्राबादच्या मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता(१९४७-४८). अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सचिव होते(१९४०). बारलिंगे हे C.P. and Berar Students’ Federationचे मुख्य सचिव होते(१९४०-४१) अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे व राष्ट्रीय युवक संघाचे ते एक संस्थापक आणि सहसचिव होते.शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्राम संपल्यावर त्यांनी मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. नांदेडच्या पीपल्स कॉलेजची जडण घडण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्या कॉलेजचे ते संस्थापक प्राचार्य होते. तसेच ते आंध्र प्रदेशातील सिद्दीपेठच्या कला व विज्ञान महाविद्यालयाचे, करीमनगरच्या एस.एस.आर. कॉलेजचे आणि हैदराबादमधील नूतन विद्या समितीच्या न्यू सायन्स कॉलेजचेही प्राचार्य होते. या सर्वच काळातील त्यांच्या आठवणी आणि संवेदनशील मनाने टिपलेले जीवनाच्या विविध अंगांचे अनुभव त्यांनी आपल्या ’ओंजळभर’ या आत्मचरित्रात सांगितले आहेत.
सुरेश बारलिंगे यांनी लिहिलेली पुस्तके
- आकाशाच्या सावल्या
- इन्किलाब
- ओंजळभर (आत्मकथन)
- खरा हा एकची धर्म
- गोष्टींचे गाठोडे (कथासंग्रह)
- तर्करेखा (भाग १, २ -सहलेखक : मो.प्र. मराठे)
- पुन्हा भेटू या (व्यक्तिचित्रे)
- भारतीय तर्कशास्त्राची रूपरेखा
- माझा देश (कथासंग्रह)
- माझे घर (कथासंग्रह)
- मी पण माझे (कादंबरी)
- साहित्य आणि संस्कृती
- सौंदर्याचे व्याकरण
सुरेंद्र बारलिंगे यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके
- A Modern Introduction to Indian Logic(1965)
- A Modern Introduction to Indian Aesthetic Theory(2007)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |