"स्नेहप्रभा प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१: ओळ २१:


==स्नेहप्रभा प्रधान यांनी गायलेली गाणी==
==स्नेहप्रभा प्रधान यांनी गायलेली गाणी==
* नटली चैत्राची नवलाई (चित्रपट : पहिली मंगळागौर, सहगायिका [[लता मंगेशकर]])
* नटली चैत्राची नवलाई (चित्रपट : पहिली मंगळागौर, सहगायिका [[लता मंगेशकर]])
* नाचो नाचो प्यारे मन के मोर(चित्रपट : पुनर्मिलन, कवी [[प्रदीप]])


(अपूर्ण)
(अपूर्ण)

१५:२९, १२ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

स्नेहप्रभा प्रधान (जन्म : बहुधा [इ.स.१९२०]; मृत्यू : डिसेंबर ७, इ.स. १९९३ या एक मराठी नाट्यसिने अभिनेत्री, गायिका आणि लेखिका होत्या. त्त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलराव प्रधान आणि आईचे ताराबाई प्रधान. वयाच्या पहिल्या दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली.

स्नेहप्रभा प्रधान यांना १९४०मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.


स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत.

स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके

  • पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
  • रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
  • सर्वस्वी तुझाच (नाटक)
  • स्नेहांकिता (आत्मचरित्र)

स्नेहप्रभा प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट

  • पुनर्मिलन (हिंदी-१९४०)(नायक किशोर शाहू)
  • पहिली मंगळागौर (१९४२) (या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.)
  • सजनी (हिंदी-१९४०)
  • सिव्हिल मॅरेज (हिंदी-१९४०)
  • सौभाग्य (हिंदी-१९४०)

स्नेहप्रभा प्रधान यांनी गायलेली गाणी

  • नटली चैत्राची नवलाई (चित्रपट : पहिली मंगळागौर, सहगायिका लता मंगेशकर)
  • नाचो नाचो प्यारे मन के मोर(चित्रपट : पुनर्मिलन, कवी प्रदीप)

(अपूर्ण)