Jump to content

"विठ्ठल भिकाजी वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३६: ओळ ३६:
==सन्मान ==
==सन्मान ==
* पुण्याचे औंध साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* पुण्याचे औंध साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* पहिल्या [[महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन|महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद (२८-११-२००७)
* अकोल्याचे ९ वे कामगार साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* अकोल्याचे ९ वे कामगार साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन -संमेलनाध्यक्ष
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन -संमेलनाध्यक्ष

२२:२४, ३ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ (जन्म : हिंगणी-अकोला जिल्हा, १ जानेवारी १९४५) हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच.डी.झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडातून या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.

डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यकृती

  • काव्यसंग्रह
    • कपाशीची चंद्रफुले
    • काया मातीत मातीत (या पुस्तकाला प्रियदर्शिनी पारितोषिक मिळाले होते.)
    • गावशीव
    • पंढरीच्या वाटेवर
    • पाऊसपाणी (या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.)
    • साय
    • वृषभ सूक्त
  • कादंबरी : डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावर)
  • संशोधनात्मक लिखाण
    • पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वागीण अभ्यास(पी‍एच.डी.चा प्रबंध)
    • पारंपरिक वऱ्हाडी म्हणी(संग्रह)
    • वऱ्हाड : इतिहास व बोली
    • वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म (पुरस्कारप्राप्त पुस्तक)
    • वऱ्हाडी म्हणींतील वाङ्‌मयीन सौंदर्य
  • रूपांतरे : म्हणी कांचन(ज्ञानेश्वरीतील ३ हजार ओव्यांचे म्हणींत रूपांतर)
  • पटकथा/गीत लेखन :
    • अरे संसार संसार- या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
    • देवकीनंदन गोपाला-गीत, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला.
    • राघू मैना - पटकथा संवाद लेखन( भूमिका : नाना पाटेकर/मधू कांबीकर)
    • शंभू महादेवाचा नवस- गीत लेखन
  • दूरचित्रवाणी मालिकाः
    • काज - पटकथा, संवाद लेखन
    • गोट्या - पटकथा, संवाद लेखन

विठ्ठल वाघ यांची गाजलेली गीते

  • काळ्‍या मातीत मातीत तिफन चालते (चित्रपट - अरे संसार संसार)

सन्मान

  • पुण्याचे औंध साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • पहिल्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२८-११-२००७)
  • अकोल्याचे ९ वे कामगार साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन -संमेलनाध्यक्ष
  • अंबाजोगाई येथील बोली साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • २०१० सालचे मुखेड येथे झालेले मायबोली साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • देहू येथे भरलेले २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • कारंजा-लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • सोळावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २००९, औरंगाबाद--संमेलनाध्यक्ष
  • २ मार्च २०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
  • १३ जानेवारी २०११ला अकोट येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलनात ‘समकालीन ग्रामीण साहित्य : डॉ. विठ्ठल वाघ गौरवग्रंथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
  • सुलतानपूर येथे कविवर्य ना.घ. देशपांडे साहित्य नगरीत झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, ३ जानेवारी २०१०.
  • १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष
  • संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन, नागपूर अध्यक्ष विठ्ठल वाघ - २५ फेब्रुवारी २०१३

पुरस्कार

  • अरे संसार संसार’ या चित्रपटातील गीतलेखनासाठी ????पुरस्कार
  • कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि पत्नी प्रभा वाघ यांना यशवंतराव प्रतिष्ठानचे यशवंत-वेणू पुरस्कार मिळाले आहेत.
  • ’पाऊसपाणी’ या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.
  • ’वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म’ या पुस्तकाला ????पुरस्कार