"बाया कर्वे पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अड... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१४:४९, १३ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब कर्वे) यांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. १९९६साली त्यांच्या या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते. आनंदी कर्वे ऊर्फ बाया कर्वे या धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नीचे अण्णासाहेबांच्या कार्यास सक्रिय साहाय्य होते.
१९९६पासून २०१३ सालापर्यंत एकूण १८ महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे. ५१,००० रुपय रोख आणि मानपत्र असे हा पुरस्काराचे २०१३सालचेे स्वरूप आहे. बाया कर्वे पुरस्कार मिळालेल्या पहिल्या १५ महिलांचा परिचय मृृणालिनी चितळे यांनी ’कर्त्या करवित्या’ या पुस्तकात करून दिला आहे.
पुरस्कारप्राप्त महिलांची नावे
१. गंगूताई पटवर्धन
२. डॉ. मंदाकिनी आमटे
३. नसीमा हुरजूक
४. पुष्पा नडे
५. प्रेमा पुरव
६. लीला पाटील
७. सुनंदा पटवर्धन
८. निर्मला पुरंदरे
९. विजया लवाटे
१०. रेणू दांडेकर
११. डॉ. स्मिता कोल्हे
१२. रजनी परांजपे
१३. मीना इनामदार
१४. सिंधू अंबिके
१५. माया तुळपुळे
१६. सिंधुताई सपकाळ (२०११)
१७. मीरा बडवे (२०१२)
१८. अनुराधा भोसले (२०१३)