Jump to content

"अशोक रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
* भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ
* भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ
* संगीत विचार
* संगीत विचार
* Keywords and Concepts: Hindustani Classical Music
* Music Contexts: A Concise Dictionary of HIndustani Music
* Essays in India Ethnomusicology
*ASAP Implementations for SAP R/3 (सहलेखक टिम रयान)=


==रानड्यांचे संगीत दिग्दर्शन/संयोजन==
==रानड्यांचे संगीत दिग्दर्शन/संयोजन==

१२:२९, २२ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

अशोक दा. रानडे (जन्म :  ? ; मृत्यू : ३० जुलै, इ.स.२०११) हे भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षे संगीतासाठी काम केले. इंग्रजी व मराठीतील गंथलेखन, नाटक-चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन, कित्येक थिमॅटिक कार्यक्रम देणारे रानडे सतत अध्यापन, लेखन आणि संगीताच्या विश्वातील एकेका संकल्पनेचा वेध घेण्यात गुंतलेले असत.

स्वत: जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी गळयात घोटवून घेतलेले डॉ. अशोक रानडे यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताला आपल्या सौदर्यशास्त्रीय दृष्टीने मोठया उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईत एन.सी.पी.ए.त(नॅशनल सेन्टर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स), महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने लावणी महोत्सव आयोजित होत असतो. त्यात लावणीवरची कार्यशाळा नेहमी आयोजित व्हायची. या कार्यशाळेत अशोक रानडे बैठकीच्या लावणीचे मर्म उलगडून सांगायचे. डॉ. अशोक रानडे यांनी लोकसंगीताला जी सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली ती निश्चितच अजोड अशी आहे.

भारतीय संगीताचे आदिम संगीत, लोकसंगीत, धार्मिक संगीत, लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत असे वर्गीकरण करून त्यामागची शक्तिस्थाने शोधण्याचा प्रयत्न सातत्याने अशोक रानडे यांनी केला. त्यांनी मुंबई विद्यापीठात संगीत विभागाची स्थापना करून त्या विभागाची सतत प्रगती घडवून आणली. आकाशवाणी, एन.सी.पी.ए., चव्हाण केंद्र अशा संस्थांमधून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम करीत असताना, अशोक रानडे यांनी संगीतसेवा आणि नाट्यसेवा केली.

अशोक दा. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • संगीताचे सौदर्यशास्त्र
  • लोकसंगीतशास्त्र
  • स्ट्रॉव्हिन्स्कीचे सांगीतिक सौदर्यशास्त्र
  • भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ
  • संगीत विचार
  • Keywords and Concepts: Hindustani Classical Music
  • Music Contexts: A Concise Dictionary of HIndustani Music
  • Essays in India Ethnomusicology
  • ASAP Implementations for SAP R/3 (सहलेखक टिम रयान)=

रानड्यांचे संगीत दिग्दर्शन/संयोजन

  • शोनार बांगला (नाटक)
  • देवाजीने करुणा केली (नाटक)
  • एक झुंज वाऱ्याची

रानडे यांनी केलेले संगीतविषयक कार्यक्रम

  • देवगाणी
  • बैठकीची लावणी, वगैरे.

अशोक दा. रानडे यांना मिळालेले पुरस्कार

  • 'चतुरंग परिवारा'चा जीवनगौरव पुरस्कार
  • भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा कलादान पुरस्कार

अशोक रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • संगीत विचार